Dry Dates
Dry Dates sakal
लाइफस्टाइल

Dry Dates for Skin Care: त्वचेसाठी खजूरही चमत्कारिक, अशा प्रकारे करा वापर

Aishwarya Musale

तुम्ही खजुराचे सेवन वारंवार करत असाल. त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही कधी खजूर वापरून पाहिला आहे का? जर नसेल तर आम्ही सांगतो कोरड्या खजूर फक्त आरोग्यासाठी फायदेशीर नाहीत. त्वचा आणि केसांची काळजी घेण्यातही ते उत्कृष्ट भूमिका बजावते. आता ते कसे वापरायचे ते जाणून घेऊ.

खजूरातील पोषक घटक: खजूर आरोग्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. कारण हे मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन ए आणि तांबे यांचा उत्तम स्रोत मानला जातो. जे आरोग्य राखण्यासाठी तसेच त्वचा आणि केसांची निगा राखण्यात चांगली भूमिका बजावते.

असा बनवा फेस स्क्रब: त्वचेच्या काळजीसाठी तुम्ही खजूरचा स्क्रब बनवू शकता आणि फेस स्क्रब म्हणून वापरू शकता. यासाठी चार ते पाच खजूर एका कप दुधात रात्रभर भिजवा. नंतर सकाळी मिक्सरमध्ये बारीक करून बारीक वाटून घ्या. त्यानंतर या पेस्टमध्ये एक चमचा मध आणि एक चमचा रवा मिसळा आणि या मिश्रणाने दोन मिनिटे चेहरा स्क्रब करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

अशा प्रकारे बनवा फेस पॅक : ​​ड्राय डेट फेसपॅक बनवण्यासाठी सात ते आठ खजूर एका कप दुधात रात्रभर भिजवून ठेवा. नंतर सकाळी बारीक करून गुळगुळीत पेस्ट तयार करा. आता या पेस्टमध्ये एक चमचा मलाई आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावून पंधरा मिनिटे तसेच राहू द्या. ते सुकल्यावर साध्या पाण्याने चेहरा धुवा. हा पॅक आठवड्यातून दोनदा वापरता येतो.

हे आहेत फायदे: त्वचेच्या काळजीमध्ये डेड स्क्रब आणि फेस पॅक वापरून त्वचेची डेड स्किन काढून टाकली जाते. यासोबतच टॅनिंग आणि सनबर्नची समस्याही दूर होते. इतकंच नाही तर खजूर व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्सपासून मुक्ती मिळवण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो.

हे त्वचेला हायड्रेट ठेवते आणि बारीक रेषा, मुरुम यासारख्या समस्या दूर करण्यास मदत करते. याच्या वापराने त्वचेवर चमक येते. तर दुसरीकडे, कोरड्या खजुरांचा वापर करून केस स्वच्छ धुवून घेतल्याने केसांची वाढ सुधारते तसेच केस कोरडेपणा आणि केस गळण्याची समस्या कमी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचे बचावकार्य तब्बल ६० तासांनंतर पूर्ण; मुंबई पालिका आयुक्तांनी दिली माहिती

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स तेजीत?

Virat Kohli On Retirement : 'माझं काम संपेल, मी निघून जाईन...' विराट कोहलीने निवृत्तीवर केलं मोठं विधान

Timepass 3 Fame Actress: ‘टाईमपास 3’ फेम अभिनेत्रीला झालाय 'हा' आजार; पोस्ट शेअर करत म्हणाली, "मी गरोदर नाहीये हे..."

Alert: तुमच्या फोनमधील प्री-इंस्टॉल असलेले ॲप्स वेळीच करा डिलीट,अन्यथा ...

SCROLL FOR NEXT