Hair Care Tips esakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips : हिवाळ्यात कोंड्यामुळे केसांमध्ये खाज सुटते? मग, फॉलो करा ‘या’ टीप्स

हिवाळ्यात केसांमध्ये कोंड्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे, टाळूला खाज येते.

Monika Lonkar –Kumbhar

Hair Care Tips : हिवाळ्यात आरोग्यासोबतच केसांची देखील काळजी घ्यावी लागते. या दिवसांमध्ये केसांवर आणि त्वचेवर थंडीचा परिणाम दिसून येतो. त्वचेसोबतच केस कोरडे होणे, केसांचा फ्रिझीनेसपणा वाढणे आणि कोंड्याची समस्या निर्माण होते.

थंडीच्या दिवसात केसांमध्ये कोंड्याचे प्रमाण देखील वाढते. या कोंड्याच्या समस्येमुळे मग स्काल्पमध्ये सतत खाज येण्याची समस्या निर्माण होते. यामुळे, केस अधिक खराब होतात.

केसांमधील ही कोंड्याची समस्या आणि खाज कमी करण्यासाठी आज आम्ही काही टीप्स सांगणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

नारळाचे तेल आणि कापूर

नारळाचे तेल आणि कापूर आपल्या केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. नारळाच्या तेलामुळे केस मजबूत होण्यास मदत होते. तसेच, नारळाच्या तेलात लॉरिक अ‍ॅसिड नावाचे सॅच्युरेटेड फॅट आढळते. ज्यामुळे, केसांमध्ये होणारी खाज थांबण्यास मदत होते.

नारळाच्या तेलात कापूर मिसळून लावल्याने केसांमधील कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिअल संक्रमण दूर होते. शिवाय, अँटी-मायक्रोबिअल गुणधर्मांमुळे टाळूची त्वचा देखील निरोगी आणि स्वच्छ राहते. परिणामी कोंडा देखील दूर होतो.

हा उपाय करण्यासाठी ३-४ चमचे नारळाचे तेल गरम करून घ्या. त्यात, २-३ कापूर घाला, आणि या तेलाने केसांचा छान मसाज करा.

बेकिंग सोडा

त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असणारा बेकिंग सोडा हा कोंड्याची समस्या दूर करतो. बेकिंग सोड्यामध्ये अ‍ॅंटीफंगल गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म स्काल्पवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतात. शिवाय, केसांमधील ph ची पातळी संतुलित ठेवण्याचे काम बेकिंग सोडा करते.

हा उपाय करण्यासाठी २ चमचे बेकिंग सोड्यात २ चमचे पाणी मिसळा. आता ही पेस्ट तुमच्या टाळूवर लावा. १५-२० मिनिटांनी केस माईल्ड शॅंम्पूने धुवा. हा उपाय केल्याने कोंड्याची समस्या आणि खाज येण्याची समस्या दूर होते आणि स्काल्प निरोगी राहतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coaching Center Blast: भयंकर! कोचिंग सेंटरमध्ये मोठा स्फोट, दोन विद्यार्थी जागीच ठार, अनेक जखमी, घटनेने खळबळ

Madha Flood Crisis : मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची आशा : गोपीचंद आमदार पडळकर

Latest Marathi News Live Update : पिकविमा जुलैमध्ये सुरू करण्याची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

FASTag New Rule : आता नाही द्यावा लागणार डबल टोल! 'UPI पेमेंट'ने पैसे वाचणार

KDMC News : 14 गाव, 27 गाव आताच बाहेर काढून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करा, 27 गाव संघर्ष समिती अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांचा इशारा

SCROLL FOR NEXT