Fashion 
लाइफस्टाइल

फॅशन टशन : फंकी लूकसाठी ट्रॅक सूट

माधुरी सरवणकर

थंडी अचानक वाढलीय ना? मग थंडीत असं वेगळं काय घालून तुम्हाला कॉलेजात हवा करता येईल? मुलांनो, थंडीत कूल दिसण्यासाठी लय भारी टिप्स मी तुम्हाला देणार आहे. लेदर जॅकेट, हुडीज, प्रिंटेड जॅकेट, कॅप, मफलर हे पर्याय तुम्ही ट्राय करतच असाल. पण, आता ट्रॅक सूट घालून तुम्ही इतरांपेक्षा हटके दिसू शकता. गेल्या काही दिवसांपासून चांगलीच थंडी जाणवत आहे. या थंडीपासून बचावासोबत छान दिसणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अनेकदा आपण दररोज काय नवीन घालायचं या विचारानं हैराण होतो.

आजकाल हुडचा (झिपर) पर्याय अधिक वापरला जात आहे. हुडीजबरोबर तुम्ही ट्रॅक पॅन्ट घातल्यास ते कॉम्बिनेशन छान दिसेल. अनेकदा रणवीर सिंग, वरुण धवन हा ट्रेन्ड फॉलो करतात. वेगवेगळ्या प्रकारचे फंकी ट्रॅक सूट सध्या ऑनलाइन उपलब्ध आहेत. स्लिम फिट कॉटनमधील ट्रॅकसूट भारी दिसतात. यात ॲनिमल प्रिंट, चेक्स सॉलिड दिसतात. तुम्ही डिस्कोमध्ये जा किंवा कॉलेजात तुमचं व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा वेगळ दिसंलच यात शंका नाही. 

हे ट्राय करा
  कॉलेजमध्ये किंवा पार्टीसाठी वापरू शकता. 
  स्निकर्स किंवा स्पोर्ट शूज वापरा.  
  यावर कॅप, गळ्यात चेन, गॉगल आदी ॲक्सेसरीज घालायला विसरू नका. 
  केस स्पाईक केल्यास या लूकवर छान दिसतील.
  फॅनी पॅक यावरही मॅच होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT