Maan Gram sakal
लाइफस्टाइल

Travel: महाभारताच्या काळाची ओळख करून देणारे माणा गाव!

आपला भारत देश विविध संस्कृती, प्रथा आणि परंपरा आणि त्याची आठवण करून देणाऱ्या दंतकथा आणि गोष्टींनी समृध्द आहे.

सकाळ डिजिटल टीम

आपला भारत देश विविध संस्कृती, प्रथा आणि परंपरा आणि त्याची आठवण करून देणाऱ्या दंतकथा आणि गोष्टींनी समृध्द आहे. हिंदू धर्मात अशीच एक खूप मोठी शिकवण देऊन गेलेली कहाणी म्हणजे महाभारत.

सनातन धर्मात चार युगांचे वर्णन केले आहे. ही अनुक्रमे सत्ययुग, त्रेता, द्वापर आणि कलियुग अशी आहेत. महाभारत द्वापार युगात घडले होते.

सनातनींच्या मते, महाभारत हे सत्याचा नेहमीच विजय होतो हे पटवून देणारे एक खूप मोठे युद्ध होते. पांडव आणि कौरव हे कुरु वंशाचे भावंडं आपल्या हक्कासाठी मानासाठी आणि प्रतिष्ठेसाठी महाभारताच्या लढाईला कुरु क्षेत्रात उतरले. या युद्धात सत्याचा विजय झाला. त्यावेळी पांडवांनी कौरवांचा पराभव केला होता आणि भगवान श्रीकृष्णाने पांडवांना साथ दिली. ही कहाणी आपल्याला माहितीच असेल.

पण महाभारताबद्दल अजून माहिती ऐकायची असेल किंबहुना ते सारे बघायचे असेल तर माणा गावात तुम्ही एक फॅमिली ट्रीप काढू शकतात.

उत्तराखंड राज्याला देवभूमी म्हणायला काहीच हरकत नाही याच राज्यामधल्या चमोली जिल्ह्यात आणि तिबेटच्या सीमेजवळ हे माणा गाव स्थित आहे. इथून तिबेटचे फक्त २६ किलोमीटर अंतरावर आहे. अलकनंदा आणि सरस्वती या दोन महत्त्वाच्या नद्यांचा संगमही माणा गावात झाला. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग ७ देखील येथून जातो. हे भारताचे शेवटचे गाव आहे.

महाभारत आणि माणा गाव:

माणा गावात महर्षी वेदव्यास यांची गुहा असल्याची धार्मिक श्रद्धा आहे. या गुहेजवळ श्री गणेशाची सुद्धा गुहा आहे. त्यामुळे अशी आख्यायिका आहे की जेव्हा महर्षी व्यासांनी महाभारत रचले आणि श्री गणेशाने ते लिहिले ते इथे यागावात त्या गुहेत लिहिले गेले आहे. महर्षी व्यासांची पोथीही याच गावात आहे.

उत्तराखंडमधील पांडुकेश्वर तीर्थक्षेत्रातील सिंहासनाचा त्याग केल्यानंतर महाराज पांडू आपल्या धर्मपत्नींसह येथे वास्तव्य करत होते, अशीही एक धार्मिक धारणा आहे. असे म्हणतात की पाच पांडवांचाही जन्म याच ठिकाणी झाला. यासाठी माणा गावाला विशेष महत्त्व आहे. माणा गावाला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांसह माना गावाला भेट देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT