कोल्हापूर : लेटेस्ट ट्रेंडमध्ये राहण्यासाठी तुम्ही प्रत्येक फॅशन ब्लॉगचा शोध घेत असता. त्यासोबतच फॅशन मॅक्झिम ट्रेंड यांच्या शोधातही असता. जर तुम्हाला खरच फॅशन फ्रीक असे म्हणत असतील, तर हे जाणून घ्या की पुरुषांच्या स्टाईलमध्ये खूप भ्रम असू शकतात. म्हणजे तुम्हाला ही स्टाईल स्टाईल सूट होते असं कुणी म्हणत असेल परंतु हा तुमचा भ्रम आहे. या स्टाईलच्या भ्रमामुळे तुमच्या लुकसाठी घेतलेल्या मेहनतीवर पाणी फिरू शकते. परंतु तुम्ही जर हे लुकसाठी आजमावून पाहत असाल, तर ते तुम्हाला बेस्टच दिसत असेल, परंतु याबाबतीत तुम्ही चुकीचे आहात. तुम्हाला तुमची स्टाईल चांगली करायची असेल तर ह्या भ्रमापासून लांब राहणे उत्तम आहे. आणि अशा भ्रमांपासून दुर राहणे चांगले आहे.
तुम्हाला नेहमी ट्रेंडमध्ये राहावं लागेल
अस अजिबात गरजेचं नाहीये की तुम्हाला ट्रेंडमध्ये राहायचं आहे. फॅशनेबल दिसण्यासाठी तुम्ही बरेच ट्रेंड कॉपी करू शकता. प्रत्येकाचा आपला आपला स्टाईल आणि लुक असतो. परंतु प्रत्येक ट्रेंड आपल्यावर सूट होईल हे काही जरूरीचे नाही. विचार करा एकादा लुक कार्तिक आर्यनला चांगला दिसत असेल हे जरुरी नाही की तुमच्यावर चांगला दिसायला हवा. यामुळे स्टायलिश राहण्यासाठी ट्रेंडला फॉलो करणे सोडून द्या.
चांगली बॉडी असेल तर लुक चांगला दिसतो
बॉडी उत्तम असेल तर तुम्ही चांगले दिसणार हे पक्क आहे. त्यामुळे कोणतेही कपडे घातले तर चांगलेच दिसणार तुमचा असा विचार तुम्ही चुकीचा असु शकतो. कारण बॉडीचे सिक्सपॅक आणि तुमच्या स्टाईल याचा काहीच संबंध येत नाही. कपडे चांगले असतील तर ते विदाऊट सिक्सपॅक चांगले दिसू शकतात. त्यासाठी तुम्हाला काहीही वेगळे करण्याची आवश्यकता नाही.
कपडे कोणी बघत नाही
काही असूदे समोरचा तुमचे व्यक्तीमत्व ओळखतो. कपडे कोणत्याही प्रकारची एहमियत ठेवत नाही तुमचा हा विचार चुकीचा आहे. कारण तुमचे कपडेच तुमच्या ड्रेसिंगला लुक देत असतात. याचा प्रभाव ही समोरच्यावर पडत असतो. त्यामुळे वेळेनुसाप लुक बदलत राहण्यापेक्षा नेहमीत उत्तम लुकमध्ये राहणे केव्हाही चांगले. मात्र बऱ्याच वेळा लोक काही विशेष कार्यक्रमाच्या ठिकाणीच विषेश लुक करतात. त्यांना वाटते इतर ठिकाणी त्यांच्या लुक वरून ओळखल जाणार नाही.
ड्रेंसिंगसाठी वेळ लागतो
छान दिसण्यासाठी वेळ लागतो. आणि वेळ द्यावा लागतो असं काही लोक मानतात. परंतु लुक संदर्भात उत्तम प्लॅनिंग केले तर तुमच्या बेस्ट लुकसाठी तुम्हाला जास्त वेळ लागत नाही. काही कपडे एकमेकांसोबत लगेच मॅच होतात. काही वेळाने याची सवय होऊन जाते आणि दरवेळी खास लूकसाठी वेगळी मेहनत करावी लागत नाही.
वेगळा ब्रँड आणि साईज एकच
कोणताही ब्रँड असेल तर त्याची स्टाईल एकसारखी असते. असे साधारण लोक मानतात. परंतु तसे चुकीच आहे. कदाचित कोणी याचा अनुभव घेतला असेल तुमच्या लक्षात येईल की साईज एकसारखी असतेच असे नाही. तुम्ही वापरत असलेला ब्रँडचे एल. एम. प्रत्येकजणामध्ये एक सारखेच असतात असे नाही.
चांगले दिसत असेल तर पैसे खर्च करावे लागतात
काही लोकांचा समज असतो कपडे चांगले तर पैसेही चांगले. काहींना असे वाटते की चांगले महागडे कपडे खरेदी केल्यामुळे आपला स्टेटस चांगला राहतो. परंतु स्टाईल आणि पैसा याचा काही संबंध नाही. स्वस्त कपड्यांतही तुम्ही ते खरेही करा तुमच्यावर उत्तम दिसेल. यावेळी तुमच्या कपड्यांच्या किमती बद्दल कोणी विचार करणार नाही. परंतु सर्वांची नजर तुमच्या लुकवर असेल. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही वरती लक्ष केंद्रित करा तुम्हाला चांगले आणि स्वस्त कपडे मिळतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.