Shirt and Pant Sakal
लाइफस्टाइल

Trending News : कोणताही सुई धागा न लावता शिवलेले कपडे पाहिले आहेत का?

वरुन साधे दिसणारे हे कपडे आकर्षणाचं केंद्र ठरत आहेत.

वैष्णवी कारंजकर

ओडिशामधल्या सुबर्णपूर जिल्ह्यातल्या डुंगुगुरीपल्ली ब्लॉकच्या सुखा गावात एका विणकर कुटुंबाने ११० वर्षांपासून एक शर्ट आणि पँट जपून ठेवली आहे. स्थानिक आणि आजूबाजूच्या भागातले लोक हे कपडे पाहण्यासाठी या विणकर कुटुंबाच्या घरी येतात. काय आहे यामागचं कारण?

साधे दिसणारे हे कपडे हे पुरातन असल्यामुळं नव्हे तर आणखी एका धक्कादायक बाबीमुळे गर्दीला आकर्षित करत आहेत. याचं वैशिष्ट्य असं की हे कपडे शिवलेले नसून विणलेले आहेत. जगन्नाथ मेहर हे त्यांच्या काळातले एक उत्तम विणकर होते, त्यांनी सुई आणि धागा न वापरता कपडे विणले.

जगन्नाथ यांनी १९१३ मध्ये हे कपडे विणले होते. आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा वापर करून त्यांनी हे कपडे एकाच कापडापासून विणले होते. हे कपडे प्रदर्शनामध्ये ठेवण्यासारखे असल्याचंही त्यांच्या आजूबाजूचे लोक सांगतात. या विणकराच्या कुटुंबातल्या सदस्यांना त्यांच्या पूर्वजांच्या विलक्षण कौशल्याचा अभिमान वाटतो.

जगन्नाथ मेहर यांचे नातू नरहरी मेहर म्हणाले, “कपडे सुई आणि धाग्याशिवाय विणले जातात. अगदी बटणंही शिवलेली नसून विणलेली आहेत. जेव्हा याबद्दल विचार करतो तेव्हा आश्चर्य वाटतं की माझ्या आजोबांनी हे कसं केलं."

इथले गावकरी टिकालाल मेहर म्हणाले, “त्यांना (जगन्नाथ मेहर) हे कौशल्य त्यांच्या पूर्वजांकडून मिळालं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कपडे तयार करण्यासाठी त्याने सुई किंवा धागा वापरला नाही." संशोधकांच्या मते, जगन्नाथ यांनी अशा कपड्यांच्या चार जोड्या चरखाच्या सहाय्याने सूत कातून विणल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Radhakrishna Vikhe Patil: दुष्काळावर विखे पाटलांचे मोठे वक्तव्य; ‘५ ऑक्टोबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल, केंद्र-राज्य मिळून मदतीचा निर्णय’

Marathi News Live Updates : कोल्हापुरात खासगी बसला भीषण आग; आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT