whiteheads  sakal
लाइफस्टाइल

Skin Care: व्हाइटहेड्सच्या समस्येमुळे हैराण असाल, तर हे उपाय जरूर करा

त्वचेवर व्हाईटहेड्स असणे सामान्य गोष्ट आहे.

Aishwarya Musale

त्वचेवर व्हाईटहेड्स असणे सामान्य गोष्ट आहे. व्हाईटहेड्स मृत त्वचेच्या पेशी आणि जास्त सीबम उत्पादनामुळे होतात. अतिरिक्त तेल त्वचेवर घाण आकर्षित करते. त्यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण साचते. ही गोष्ट व्हाईटहेड्समुळे होते. यामुळे तुमची त्वचा खूप खराब दिसते. हार्मोन्समधील बदल आणि शरीरात पाण्याची कमतरता यामुळेही व्हाइटहेड्स होतात.

व्हाईटहेड्स असल्यामुळे त्वचेवर खाज सुटणे आणि जळजळ होऊ लागते. त्यामुळे त्वचेचे छिद्र बंद होतात. ते त्वचेवर जखमासारखे दिसतात. व्हाईटहेड्स काढण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक पद्धतीही वापरून पाहू शकता.

क्लिन्झर

त्वचेसाठी क्लिन्झर वापरा. ते चेहऱ्यासाठी उत्तम असते. महत्वाची गोष्ट म्हणजे सूट होत असलेलं क्लिन्झर वापरा. कारण त्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते.

एक्सफोलिएशन

त्वचेसाठी एक्सफोलिएशन खूप महत्वाचे आहे. आठवड्यातून किमान दोनदा त्वचा स्क्रब करा. याच्या मदतीने तुम्ही त्वचेचे मृत पेशींपासून संरक्षण करू शकता. याने तुमच्या त्वचेचे छिद्र खोलवर स्वच्छ होतात. याच्या मदतीने तुम्ही त्वचेवर साचलेली घाण काढून टाकू शकता. याने व्हाईटहेड्सपासून सुटका मिळते.

मलम

व्हाईटहेड्समुळे, कधीकधी त्वचेवर सूज देखील येते. कधीकधी त्यांना काढून टाकणे खूप वेदनादायक असते. या प्रकरणात, आपण मलम किंवा जेल वापरू शकता. हे सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करू शकतात.

टी ट्री ऑइल

आपण त्वचेसाठी टी ट्री ऑइल वापरू शकता. यासाठी टी ट्री ऑइल त्वचेवर 10 मिनिटे लावा. यानंतर त्वचेला पाण्याने धुवा. त्वचेवर टी ट्री ऑइल लावण्यासाठी कॉटन बॉल वापरा.

एलोवेरा जेल

व्हाईटहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही एलोवेरा जेल वापरू शकता. त्वचेवर 10 मिनिटांसाठी एलोवेरा जेल लावा. यानंतर ते धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Payment: यूपीआय पेमेंटला 'चार्ज' लागणार का? केंद्र सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण; मोठ्या व्यापाऱ्यांसाठी वेगळा नियम

संसदेत बाजी पलटणार? मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर भाजपला मिळाली जुन्या मित्र पक्षाची साथ, मोठ्या पक्षाचा NDA ला पाठिंबा

Latest Marathi News Live Update : पुन्हा एकदा पुणेरी बॅनर चर्चेत... आगळ्या -वेगळ्या पद्धतीने सरकारचा निषेध

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! पुढचे दोन दिवस महत्त्वाचे, बैठकांना सुरुवात; 'हे' 5 मुद्दे गाजणार

रेल्वे पुनर्वसन प्रकल्पासाठी जागा मोकळी करणे आवश्यक; गणेश नगर-मेघवाडी कारवाईवर DRP चं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT