Cooling Face Pack Sakal
लाइफस्टाइल

Summer Face Pack: उन्हाळ्यात चेहऱ्यावर लावा 'हे' 4 कुलिंग फेस पॅक, मिळेल थंडावा

Summer Face Pack: उन्हाळ्यात चेहऱ्याला थंडावा मिळावा यासाठी कोणते कुलिंग फेस पॅक्स वापरावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

try these homemade cooling face pack in summer gulab jal chandan

उन्हाच्या कडक झळा सुरू झाल्या आहेत. याचा आरोग्यासह त्वचेवर देखील वाईत परिणाम होतो. कडक उन्हामुळे पिपंल्स, घामोळ्या, जळजळ यासारख्या त्वचेसंबंधित समस्या निर्माण होतात. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी स्किन केअर रूटिमनध्ये पुढील फेसपॅकचा वापर करू शकता. यामुळे त्वचा हायड्रेट राहते. चला तर मग जाणून घेऊया कुलिंग फेस पॅक कसे बनवावे आणि त्याचा वापर कसा करावा.

  • चंदन आणि गुलाब जल

चंदन थंड असते. चेहऱ्यावर चंदन लावल्याने थंडावा मिळतो. तुम्ही चंदन आणि गुलाब जल मिक्स करून फेस पॅक तयार करू शकता. यासाठी 2 चमचे चंदन पावडर घ्यावे आणि त्यात गरजेनुसार गुलाब जल टाकावे. नंतर थोडे मध मिक्स करावे. नंतर चेहऱ्यावर हे पॅक लावावे. 15 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.

  • गुलाब जल आणि मुलतानी माती

उन्हाळ्यात चेहऱ्यावर मुलतानी माती लावणे फायदेशीर असते. यामुळे चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी होतात. तुम्ही गुलाब जलसोबत मुलतानी माती लावू शकता. यासाठी एका छोट्या भांड्यामध्ये 2 चमचे मुलतानी माती घ्यावी आणि त्यात गरजेनुसार गुलाब जल टाकावे. नंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी. 10 ते 15 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवावा.

  • टोमॅटो आणि दही

टोमॅटोध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. जे त्वचेसाठी फायदेशीर असते. तुम्ही दही आणि टोमॅटो मिक्स करून पेस पॅक तयार करू शकता. यासाठी टोमॅटोची पेस्ट तयार करा. नंतर त्यादही मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेहऱ्यावरचा टॅन कमी होण्यास मदत मिळते.

  • पुदिना आणि दही

पुदिना आरोग्यासह त्वचेसाठीही फायदेशीर असते. तुम्ही पुदिन्याचे पान आणि दही वापरून फेसपॅक तयार करू शकता. यासाठी अर्धा कप दही घ्या आणि त्यात पुदिन्याची बारिक केलेली पानं टाकावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी. चेहरा सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून 3983 क्युसेक विसर्ग; कृष्णा नदीची पातळी वाढणार, आज सायंकाळपर्यंत पाणी पोहोचणार सांगलीत

Gangs Of Wasseypur: वासेपूर पुन्हा गोळीबाराने हादरले; फहीम खानच्या भावावर दिवसाढवळ्या हल्ला, गँगवॉर पुन्हा भडकणार?

Xiaomi 18 Pro Series होणार लाँच! 8500mAh बॅटरी, ड्युअल 200MP Leica कॅमेरा; पाहा नव्या फ्लॅगशिपचे भन्नाट फीचर्स!

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Mumbai Water Metro: मुंबई वॉटर मेट्रोसाठी समुद्रतळाचा मोठा अडथळा; खडकाळ भागात ‘रॉक ड्रेजिंग’, २५० किमी जलमार्गांचा विकास

SCROLL FOR NEXT