New Year Party Look esakal
लाइफस्टाइल

New Year Party Look : न्यू इयर पार्टीसाठी ‘या’ टिप्सच्या मदतीने करा मेकअप, दिसाल ग्लॅमरस

न्यू इयर पार्टीला जाण्यासाठी महिलांना खास तयारी करावी लागते. पार्टीवेअर आऊटफीट्सपासून ते ज्वेलरी आणि मेकअप लूक्सपर्यंत या सर्वच गोष्टी करण्यावर महिलांचा भर असतो.

Monika Lonkar –Kumbhar

New Year Party Look : अवघ्या २ दिवसांवर नवीन वर्ष येऊन ठेपले आहे. या नव्या वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी अनेक जण विविध प्रकारचे प्लॅन्स बनवतात. न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी काही जण फिरायला जाण्याचा प्लॅन करतात तर काही जण पार्टीचे आयोजन करतात.

या न्यू इयर पार्टीला जाण्यासाठी महिलांना खास तयारी करावी लागते. पार्टीवेअर आऊटफीट्सपासून ते ज्वेलरी आणि मेकअप लूक्सपर्यंत या सर्वच गोष्टी करण्यावर महिलांचा भर असतो.

पार्टीत आपण उठून दिसावे असे प्रत्येकीला वाटते. आज आम्ही तुम्हाला खास न्यू इयर पार्टीतील मेकअप लूक्साठीच्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यावर तुम्ही पार्टीत उठून दिसाल यात काही शंका नाही.

ग्लिटरी आयमेकअप

पार्टीसाठी नेहमीच केला जाणारा हा ग्लिटरी आयमेकअप तरूणींमध्ये विशेष लोकप्रिय आहे. ग्लिटरशिवाय पार्टी पूर्ण होऊच शकत नाही. कारण, या ग्लिटर आयमेकअप लूकमुळे तुमचा पार्टीलूक हा ग्लॅमरस दिसतो.

Glitary

या ग्लिटरी आयमेकअप लूकसाठी तुम्ही गोल्डन, सिल्वर, ब्राऊन आणि ब्रॉंझ कलरच्या आयशॅडोजचा वापर करू शकता. ब्लॅक किंवा रेड आऊटफीटवर हा ग्लिटरी आयमेकअप अधिक उठून दिसेल.

क्लासिक रेड लिप्स

कोणतीही पार्टी असुद्या त्यात जर तुम्ही रेड लिप्सच्या लूकशिवाय गेलात तर पार्टीमध्ये उठून दिसणार नाही. मागील कित्येक वर्षांपासून क्लासिक रेड लिप्स हा मेकअप लूक ग्लॅमरच्या दुनियेत प्रसिद्ध आहे. अनेक महिलांची आणि तरूणींची या क्लासिक रेड लिप्सला पसंती असते.

Classic red lips

न्यू इयर पार्टीसाठी तुम्ही हा क्लासिक रेड लिप्सचा मेकअप लूक ट्राय करू शकता. कोणताही आऊटफीट असुद्या त्यावर रेड लिप्सचा लूक मॅच होतो. त्यामुळे, हा रेड लिप्स लूक मिस करू नका तो नक्की ट्राय करा आणि पार्टीमध्ये चारचॉंद लावा.

कलरफूल बेसलाईन

न्यू इयर पार्टीची रंगत वाढवण्यासाठी तुम्ही डोळ्यांच्या मेकअपसोबत थोडे वेगळे प्रयोग करायला काही हरकत नाही. तुम्ही यासाठी कलरफूल बेसलाईनचा वापर करू शकता. डोळ्यांच्या बेससाठी नेहमीच ब्लॅक किंवा ब्राऊन कलरचा वापर करण्यापेक्षा तुम्ही कोणताही ब्राईट कलरचा आयशॅडो वापरू शकता.

Colourful Baseline

यामुळे, तुमच्या डोळ्यांना छान कलरफूल लूक येईल. हिरवा, पिवळा, लाल किंवा गोल्डन कलरच्या आयशॅडोजचा वापर तुम्ही पार्टीलूकसाठी करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT