Dhanteras  sakal
लाइफस्टाइल

Dhanteras 2024: घरात सुख समृद्धी येण्यासाठी धनत्रयोदशीला करा हे उपाय, जाणून घ्या

दिवाळी-धनत्रयोदशीला करा हे उपाय...

Aishwarya Musale

धनत्रयोदशीला कुबेराची तर दिवाळीला लक्ष्मीची पूजा केली जाते. असे मानले जाते की, लक्ष्मी आणि कुबेराला प्रसन्न केल्यास कधीही धनाची कमतरता भासत नाही.  हिंदू धर्मात धनत्रयोदशीला खूप महत्त्व आहे.

धनत्रयोदशीचा सण, दिवाळीच्या सणाच्या आधी येतो. यादिवशी माता लक्ष्मीची उपासना करतात. या दिवशी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे उपाय केल्यास तुम्हाला धन-संपत्ती नक्कीच मिळते. तसेच तुमच्या घरातून गरिबी दूर होते.

या दिवशी व्यापारी लोक आपल्या हिशोबाच्या नव्या वह्यांची पुजा करून त्यांचा वापर करण्यास सुरूवात करतात. या दिवशी धनाची आणि लक्ष्मीची पुजा देखील बऱ्याच ठिकाणी केली जाते.

आजच्या दिवशी नव्या कपडयांची आणि अलंकारांची खरेदी करणे शुभ समजली जाते. यादिवसाचा आणखी लाभ कसा मिळवायचा ते पाहुयात.

फुटलेली भांडी दान करा

घरातील स्वयंपाकघरात असलेली जुनी तुटलेली, गंजलेली भांडी वापरणे बंद करा. आणि नवीन भांडी खरेदी करा. नवीन भांड्यांच्या रूपात घरात लक्ष्मी येते. जूनी भांडी फेकून न देता ती दान करू शकता. तुमच्या घरात काम करणार्‍या स्त्रीयांना भांडी दिली तर त्यावर शनि प्रसन्न होतो.

देवीला लवंग अर्पण करा

धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी देवीला पती-पत्नी दोघांनी लवंग अर्पण कराव्यात. देवी लक्ष्मीला लवंग खूप प्रिय आहे. लवंगसोबत वेलची आणि सुपारीही दान करता येते. एवढेच नाही तर धनत्रयोदशीला तुम्ही देवी लक्ष्मीला पानही अर्पण करू शकता.

नाण्यांची पूजा

दिवाळीत खरेदी केलेली सोन्याची किंवा चांदीची नाणी लक्ष्मीच्या पूजेमध्ये पूजली जातात. असे केल्याने व्यवसायात यश मिळते. सोने चांदी नसेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी देवीच्या फोटोजवळ पैसे ठेऊन त्याची पूजा करावी.

कुबेराची पूजा

धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीसोबत कुबेरजींचीही पूजा करावी. कुबेरजींची पूजा करण्यासाठी कुबेर यंत्र खरेदी करून धनत्रयोदशीच्या दिवशी त्याची पूजा करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

SCROLL FOR NEXT