लाइफस्टाइल

Tulsi Vivah 2023: तुळशीच्या लग्नाला अंगण सजवा रांगोळीने, या आहेत सोप्या आणि सुंदर डिझाईन

आज आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या रांगोळी डिझाईन घेऊन आलो आहोत.

Aishwarya Musale

हिंदू धर्मात तुळशीला फार महत्व आहे. तुळशीची पानं प्रत्येक शुभ कार्यात वापरले जातात. तुळशी विवाह कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला केला जातो. या विशेष दिवशी लोक दरवर्षी तुळशी विवाहाचे आयोजन करतात. हा उत्सव वृंदावन, मथुरा आणि नाथद्वारा येथे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

या तुळशी विवाहाला तुम्ही या सोप्या आकर्षक आणि छोट्याशा जागीही नीट बसतील अशा रांगोळ्या काढू शकतात.

१. तुळशी आणि शाळिग्रामची विवाह गाठ

एक तुळशी वृंदावन काढून त्याच्या खाली एका जोडप्याची बांधलेली गाठ रेखाटली आहे आणि त्याच्या आजूबाजूने चौकट दिसेल अशी बॉर्डर म्हणून पणत्यांनी तुम्ही सजवू शकतात.

२. स्टीपलिंग केलेले तुळशी वृंदावन

सध्या स्टीपलिंग केलेली रांगोळी काढण्याची खूप जास्त आवड आहे. काही छोटे छोटे तंत्र वापरून तुळशी वृंदावन काढून आजूबाजूला मेणबत्या असलेल्या पणत्या ठेवून ही रांगोळी उठून दिसते.

३. 3D रांगोळी

साधे चौकटीत रंग भरून, एक सुंदर 3D रांगोळी काढू शकतात. हे तुळशीचं वृंदावन खूप सुंदर दिसतं आहे. त्याच्या आजूबाजूला तुम्ही पणत्याही ठेवू शकतात.

४. तुळस आणि कृष्णाची मूर्ती

जमिनीवर लाल रंगाची चौकट काढून त्यावरती तुळशीची कुंडी आणि दुसऱ्या बाजूला कृष्णाची मूर्ती ठेवून पुढे सौभाग्य अलंकार ठेवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K High Court Bench: लडाखमध्ये जम्मू-काश्मीर हायकोर्टची बेंच स्थापन होणार! केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, नागरिकांना मोठा दिलासा

CSMT Ghee Scandal: धक्कादायक! ‘मानवी सेवनासाठी नाही’ असे तूप मोटरमनच्या ताटात; सीएसएमटीतील ‘साई कटर्स’ कॅन्टीन बंद

Marwade Bypass : मरवडे बायपास मागणी आंदोलनात वाहतूक अडथळा; 35 ग्रामस्थांवर गुन्हे दाखल, सनदशीर आंदोलनाला शिक्षा?

Latest Marathi News Live Update: ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर कु. रुचिता आढळरावने कमावले ५० लाख

Golden Jubilee Celebration: वळतीत सुवर्णमहोत्सवी हरिनाम सप्ताह; ‘भक्तपंढरी’च्या देखाव्याने गाव झाले पंढरपूरसमान भक्तिमय

SCROLL FOR NEXT