love google
लाइफस्टाइल

प्रेम आणि आकर्षण यांतील फरक घ्या समजून

खुप लोकांना प्रेम आणि आकर्षण यातला नेमका फरकच कळत नाही. कारण प्रेम आणि आकर्षण या दोघांमध्ये एक अत्यंत बारीक रेषा असते .जी तुम्हाला समजून घ्यावी लागेल.

दिपाली सुसर

मुंबई : अनेकवेळा तुम्ही काही प्रश्नांची उत्तरे शोधत असता पण कुठेच मनासारखं उत्तर मिळत नाही ? जसे की जेव्हा तुम्ही एखाद्याला आवडू लागता तेव्हा तुम्ही गोंधळून जाता की तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करता की ती फक्त आकर्षणाची भावना आहे.

खुप लोकांना प्रेम आणि आकर्षण यातला नेमका फरकच कळत नाही. कारण प्रेम आणि आकर्षण या दोघांमध्ये एक अत्यंत बारीक रेषा असते .जी तुम्हाला समजून घ्यावी लागेल.

जर तुम्हालाही अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत असेल आणि तुमच्या जोडीदारासोबतही तुम्हाला खरोखर काय वाटते हे तुम्ही समजु शकत नसाल, तर तुम्ही या सोप्या मार्गांनी त्या गोष्टी समजु शकता.

चला तर मग बघु कोणत्या गोष्टी आहेत त्या

1)प्रेमात निस्वार्थीपणा आणि आकर्षण

जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी काहीही करण्यास तयार असता. त्यांच्या गरजा, इच्छा आणि यशामध्ये तुम्हाला आनंद होतो. पण जेव्हा तुमचं एखाद्या प्रती फक्त आकर्षण असत तेव्हा तुम्ही फक्त तुमच्या गरजा आणि इच्छांचा विचार करता. जेव्हा नात्यात हा फरक येतो, तेव्हा त्याचे ब्रेकअप व्हायला वेळ लागत नाही. प्रेमाने बांधलेली नाती नेहमीच मजबूत राहतात.

2)प्रेम स्वातंत्र्य देते आणि आकर्षण बंधणे घालतं.

प्रेम ही एक भावना आहे जी तुम्हाला खूप मोकळी वाटते. तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे समजून घेते. तुमच्या भावनांचा आदर करतो. पण हेच फक्त तुमच्या विषयी आकर्षण असले की होत नाही. यामध्ये मग अनेकवेळा पार्टनर तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो हे तुमच्या लक्षात आले असेल. केव्हा काय करायचे ते तो तुम्हाला सांगतो. कधी कधी तरी त्याच्या बोलण्यात अडकून तुम्ही स्वतःला दुखवू लागता. खरा प्रेमात पडलेला जोडीदार आपल्याशी हे असं कधीच असे वागत नाही.

3)नुसते आकर्षण नाही तर त्याला प्रेमाची जोडही लागते.

प्रेम कायम टिकून असतं जेव्हा तुम्ही खरोखर एखाद्याच्या प्रेमात पडता तेव्हा तुम्हाला ती किंवा तो आयुष्यभरासाठी हवा असतो. त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्यापासुन वेगळे करण्याचा कधी विचार करू शकत नाही. आणि हे जर तुम्ही एखाद्याकडे आकर्षित झालात तर काही काळानंतर तुम्हाला त्याच्याबद्दल वाटू लागते. पण ती व्यक्ती कधीही तुमच्या पासून दुर जाऊ शकतो.

4)प्रेम तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतं.

तुम्ही आयुष्यात पुढे जावे आणि खूप प्रगती करावी अशी तुमची खरी जोडीदार नेहमीच इच्छा असते. प्रेमात जोडीदार एकमेकांसोबत आपल्या प्रेमाला देखील वाढवत असतात आणि सोबतच एकमेकांच्या मूल्यांचा आदर करतात. खरे प्रेम करणारे चांगल्या आणि वाईट काळात दोघेही एकमेकांना साथ देतात. आणि याउलट घडतं ज्याची एकमेकांनप्रती फक्त आकर्षणाची भावना असते . अशा लोकांच नाते हे काही काळानंतर विषारी बनतं.आणि असे लगेच संपुष्टात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भागवत कांबळे रंगेहाथ अडकले

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT