Raosaheb Danve esakal
लाइफस्टाइल

दाजींचा नादच खुळा! रावसाहेब दानवेंचा फिटनेस फंडा माहितीय? जाणून घ्या केंद्रीय मंत्र्याची लाईफस्टाईल

दाजींचा नादच खुळा ! व्यायामासाठी दररोज देतात एक तास

सकाळ डिजिटल टीम

राजकारण म्हटलं की बऱ्याच वेळा राजकारणी मंडळींना घराबाहेर राहावे लागते. मग आरोग्याकडे दुर्लक्ष होते. यातून वेगवेगळ्या व्याधी जडतात. मात्र असे काही राजकारणी आहेत, जे व्यस्त वेळेतूनही व्यायामासाठी वेळ काढतात. यापैकीच एक आहेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve). त्यांच्या व्यायामाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे अनेकांनी पाहिला आहे. जाणून घेऊ या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलेला फिटनेस मंत्रा..

(Union Minister Raosaheb Danve Tell His Fitness Mantra To The People)

व्यायाम मी आजच करतोय असं नाही. गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे बालपणापासून व्यायाम करतोय. परंतु राजकारणात आल्यानंतर धकाधकीच्या जीवनामध्ये सातत्य राहत नव्हतं. वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करावा लागतो. आणि त्या ठिकाणी सवंगडी व्यायाम करायला भेटतातच असं नाही. आणि मुंबई, पुणे आणि दिल्ली किंवा अन्य ठिकाणी एकटा माणूस अशा प्रकारचा व्यायाम करु शकत नाही. मग त्यात खंडही पडतो. गावी असल्यास जुने सहकारी एकत्र येतात. आम्ही सगळे सकाळी जमतो. आणि सोबत व्यायाम करतो. एक तास दररोज आम्ही सगळे जण व्यायाम करतो. काठी फिरवणं, हा एक प्रकारचा व्यायामच आहे. आणि आज नाही तर मी वयाच्या दहाव्या वर्षापासून काठी फिरवतो. आणि बालपणी शाळेत असताना आमचे गाव छोटे होते. १०-१२ किलोमीटर आम्ही शाळेत जायचो. आणि शाळेत जाताना हा बारा किलोमीटर चालणे हा सुद्धा त्या काळातला व्यायाम होता.(Fitness Of Raosaheb Danve)

Raosaheb Danve

त्यामुळे आमचे शरीर पिळदार झाले आहे. कधीच आमची शाळा गावापासून दोन मिनिटांवर नव्हती. दहा, बारा कधी पाच किलोमीटरवरील शाळांमध्ये आम्ही जायचो. त्याच्या मुळे हा व्यायाम आम्ही गेल्या अनेक वर्षे करतो. राजकारणामध्ये काम करत असताना जेवण कधी वेळेवर नसतं. झोप वेळेवर नसते. आणि आपल्या बाॅडीच्या विरुद्ध सर्व कामे करावी लागतात. आता जेवण पाहिजे तर जेवण आताच मिळेल असं नाही. कार्यक्रमांची रेलचेल असते. आणि अशा याच्यातून माणसाचे जे शरीर आहे त्याच्यावर नक्कीच परिणाम होतो. त्यामुळे जर का या ही धावपळीमध्ये अशा प्रकारचा व्यायाम केला तर मला वाटत की शरीर चांगल राहण्यासाठी मदत होते.

व्यायाम करण्याचा स्टॅमिना

ज्या गोष्टीत सातत्य असेल त्या करायला वयाची अट नाही. मीच काय माझ्याबरोबर ३०-चाळीस वयाची म्हणजे तरुण आहेत. ते सुद्धा माझ्याबरोबर दम मारत नाहीत. त्याच कारण त्याच्यात सातत्य नाही. आणि माझं सातत्य असतं. पिक्चर पाहायला २५ वर्षे झालीत. राजकारणातील माणस आहेत, जी आवडतात. नरेंद्र मोदी जे सतत योगा करतात. त्यामुळे त्यांची फिटनेस चांगली आहे. स्वतःसाठी सकाळी एकतास दिला पाहिजे. शक्य होत नाही. मलाही कुठे-कुठे शक्य होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Sons N Chandrasekaran : टाटा समूहाला मोठा धक्का? चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याच्या बातमीने शेअर्स गडगडले, TCS मध्ये मोठी घसरण

Sri Lanka squad for 1st Test vs India: विजय आपलाच... भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून श्रीलंकेच्या दोन स्टार खेळाडूंची माघार; १५ सदस्यीय संघ जाहीर

हातात पिशव्या, पायात चप्पलही नाही... लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी चक्क कंडक्टरसोबत पळाली; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Mumbai Emergency Helpline Numbers: मुंबईत दरड कोसळल्यास किंवा आपत्कालीन स्थितीत कोणता नंबर डायल कराल? जाणून घ्या सर्व हेल्पलाईन क्रमांक

Marathi News Live Updates : चंदा चोर, चंदा चोर! लोकसभेत विरोधकांची घोषणाबाजी, अमित शहांना चर्चेला बोलवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT