Use ayurvedic herbs to keep the liver healthy food marathi news 
लाइफस्टाइल

लिव्हरला निरोगी ठेवण्यासाठी 'या' आयुर्वेदिक जडीबुटीचा करा  वापर 

अर्चना बनगे

कोल्हापूर :  शरीराला निरोगी ठेवण्याचे काम  लिव्हर मार्फतच होत असते. त्यामुळे शरीरातील महत्त्वाचा भाग असलेल्या लिव्हरचे आरोग्य सुस्थितीत ठेवणे गरजेचे आहे. यासाठी आपण काही घरगुती उपाय सहजपणे करू शकतो. शरीराच्या या महत्वपूर्ण  अवयवाकडे आपण दुर्लक्ष केल्यास आपणास कावीळ सारखे आजार त्याचप्रमाणे अंगामध्ये चरबी  वाढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होऊ शकतात.यासाठी लिव्हरची वेळोवेळी काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे  आपले शरीर  तंदुरुस्त राहण्या बरोबरच आपण अनेक आजारापासून नक्कीच वाचू शकतो. 

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपल्या दैनंदिन वापरातील अनेक खाद्यपदार्थ आणि जडीबुटी  लिव्हर साठी उपयुक्त ठरतात. याबाबत आपण नियोजनबद्धरीत्या याचा आहारामध्ये उपयोग केल्यास आपले आरोग्य स्वस्थ राहण्यास मदत होते. लिव्हर संपूर्ण शरीराला डिटॉक्स करत असते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी लिव्हर मदत करते.  त्यामुळे लिव्हरला निरोगी ठेवण्यासाठी जडीबुटी,  फळ- भाज्यांचा वापर करता येतो.  आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक जडीबुटी यांच्या विषयी माहिती देणार आहोत जे तुमच्या लिव्हरला निरोगी ठेवण्यास मदत करेल.

लिव्हर  शरीरामध्ये असे काम करते

लिव्हर  शरीरामध्ये प्रोटीन निर्माण करण्यापासून ते कार्बोहायड्रेट साठवणूक करण्याचे काम करत असते. त्याचबरोबर शरीरात पोषक तत्व शोषून घेण्या बरोबर पित्त तयार होण्यासाठी लिव्हरची भूमिका महत्वपूर्ण ठरते. लिव्हरचे कार्य मंदावल्यास त्याचा मोठा परिणाम  शरीरातील अन्य अवयावर होत असतो. त्यामुळे लिव्हर ची काळजी घेणे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते.

लिव्हरला तंदुरुस्त ठेवण्यासाठी या गोष्टींचा करा वापर

 1) लसून :  आपल्या दैनंदिन आहारामध्ये लसुन हा अविभाज्य घटक आहे .लसून हे आयुर्वेदामध्ये अत्यंत गुणकारी असे समजले जाते. लसणामुळे आपण अनेक आजारापासून वाचू शकतो. त्याच बरोबर लसना पासून बनवलेल्या चहाचे नियमित  सेवन केल्यास  शरीरातील वाढत्या चरबीच्या  समस्या पासून आपण वाचू शकतो. लिव्हरचे कार्य चांगले राहण्यासाठी लसणाचा उपयोग महत्त्वपूर्ण ठरतो.


2) आवळा :  विटामिन सी हा शरीरात एक अत्यावश्यक घटक ठरतो. विटामिन सी मुळे लिव्हरच्या च्या आसपास जमा होणारी चरबी कमी होते. विटामिन सी  हे आवळ्यापासून मोठ्या प्रमाणात मिळत असते.आयुर्वेदामध्ये हि आवळ्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. आवळा हा आपण कच्च्या स्वरूपात, ज्युस अथवा पावडरच्या स्वरूपात ही  वापर करू शकतो.


3) त्रिफळा : शरीरातील अनेक समस्या कमी करण्यासाठी आयुर्वेदिक मध्ये त्रिफळाला अधिक महत्त्व आहे. त्रिफळा चूर्ण हे आवळा ,बेहडा आणि हिरडा यांच्या जडीबुटी यापासून तयार केले जाते. शरीरातील मेटाबोलिजम चांगल्या पद्धतीने ठेवण्याबरोबरच लिव्हरचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी त्रिफळा चा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. या तीन घटकाचा वापर नियमितपणे करा आणि आपले शरीर सदृढ  बनवा.

डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

Parbhani News: फ्लॅट संस्कृती वाढली; पण घर घेणे झाले महाग!; रेडीरेकनर दरवाढीचा फटका;नागरिकांचे बजेट कोलमडले

IPL Viral Video: ए चल निघ आता... इशान किशनला आऊट करत SRH च्याच गोलंदाजाचा रागात इशारा, मग पुढे...

Raam Navami 2026: रामनवमीपूर्वी 'या' 5 गोष्टी घरात आणा, सुख-समृद्धी निश्चित अन् माता लक्ष्मीचे आगमनही होईल

ना कुत्रा ना मांजर; पूजा सावंतला घरात पाळायचा आहे हा भयंकर प्राणी ! अभिनेत्रीचा खुलासा

SCROLL FOR NEXT