use of coconut oil for face a toner and face mask also easy tips 
लाइफस्टाइल

मॉर्निंग स्कीन रुटीनमध्ये नाराळाच्या पाण्याचा होतो वापर; काही खास टिप्स

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. यासोबतच त्वचेची गरम हवा, ऊन, प्रदूषण यापासून काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये हे जरुरीचे आहे की तुम्ही सकाळी, संध्याकाळी तुमच्या त्वचेची योग्य काळजी घेतली पाहिजे. यासाठी तुम्हाला तुमच्या मॉर्निंग स्किन रुटीनमध्ये नारळाच्या पाण्याचा वापर करावा लागेल. नारळाचे पाणी गरमीच्या हंगामात त्वचेसाठी डीहायड्रेड म्हणून काम करते. तसेच कोणत्याही प्रकारच्या संक्रमणापासून त्वचेचं रक्षण करते. तुम्ही नारळाच्या पाण्याचा वापर करून चेहरा क्लीन करू शकता. तसेच याचा फेस टोनर आणि फेस पॅक म्हणूनही वापर करू शकता.

नारळ पाणी फेसवॉश

सामग्री 

  • 1 छोटा चमचा मध 
  • 1 छोटा चमची नाराळाचे पाणी 
  • 1 मोठा चमचा केमिकल फ्री फेस वॉश 


कृती

एका बाउल मध्ये फेसवॉश घ्या. आणि त्यामध्ये मध आणि खूप नारळाचे पाणी मिक्स करा. या मिश्रणाने चेहरा साफ करा. चेहरा साफ करतेवेळी वर्तुळाकार पद्धतीने गालावरती बोटांनी फिरवु शकता. यानंतर चेहऱ्याला नॉर्मल पाण्याने स्वच्छ करा.

नारळ पाणी फेस टोनर

  • 3 मोठे चमचे नाराळाचे पाणी
  • 1 मोठे चमचे ग्रीन टी पाणी
  • 2 मोठे चमचे गुलाब जल 
  • 1 स्‍प्रे बॉटल 

कृती

प्रथम पॅनमध्ये थोडे पाणी घेवून ते उकळून घ्या. आता या पाण्यात ग्रीन टी घालून ते दोन मिनिटांसाठी शिजू द्या. आता यातील ग्रीन टी चे कण बाजूला करून गरम पाणी थंड होऊ द्या. हे पाणी थंड झाल्यानंतर त्यामध्ये गुलाबजल किंवा नारळाचे पाणी घाला. या पाण्याला एका स्प्रे बॉटलमध्ये ठेवा. आणि सकाळी चेहरा क्लीन करताना याचा टोनर म्हणून वापर करा.

नारळ पाणी फेस मास्क

  • 1 छोटा चमचा खीरेचा रस 
  • 1 मोठा चमचा नाराळाचे पाणी
  • 1 मोठा चमचा एलोवेरा 
  • 1 मोठा चमचा चंदन पाउडर 

कृती 

एका बाऊलमध्ये चंदन पावडर घेऊन त्यात एलोवेरा जेल मिक्स करा. आता यामध्ये नारळाचे पाणी घाला. आणि हे मिश्रण उत्तम प्रकारे एकत्र करून घ्या. वीस मिनिटानंतर या पाण्याने चेहरा साफ करा. चेहऱ्यावरील पोर्स क्लोज करून चेहरा स्वच्छ धुवुन घ्या.

गरमीच्या हंगामात त्वचेला तरोताजा ठेवण्यासाठी मॉर्निंग स्किन केअर रुटीनेमध्ये नारळाच्या पाण्याचा वापर करणे गरजेचे आहे. जर तुमची त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर याच्याशी संबंधित विशेष तज्ञ लोकांशी संपर्क करावा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: खामेनेई यांचं भारतातल्या 'या' गावाशी होतं खास कनेक्शन; मृत्यूची बातमी कळताच गावावर शोककळा

Ajit Pawar: बारामती वैद्यकीय रुग्णालयास अजित पवार यांचे नाव; राज्य शासनाने घेतला निर्णय

Video : 'असा' झाला शुभविवाह मालिकेचा शेवट ! अभिनेत्रीने शेअर केले Behind The Scene

स्वावलंबी ज्येष्ठांसोबत ‘तिघी’ टीमची रंगली सात्विक होळी

Ali Khamenei कुठे लपलेत? America-Israel ला कसं कळलं? नियोजित वेळेपूर्वी हल्ला का केला? |Iran

SCROLL FOR NEXT