Home Tips esakal
लाइफस्टाइल

Home Tips : घरातले सोफे घाण झालेत? 'या' टिप्सने चमकवा

प्रत्येकच घरात सोफा आढळतो. ते बसायला जेवढे कम्फर्टेबल आसतात. तेवढेच स्वच्छ करायला कठिण असतात. आज आम्ही तुम्हाला जुने सोफे साफ करण्याच्या टिप्स देणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

घरात साफसफाई नाही झाली तर काहीच चांगले वाटत नाही. सोबतच बरेच आजारही होण्याचा धोका असतो. आजकाल प्रत्येकच घरात सोफा असतो. लोक आरामाच्या सोबतच घर चांगले दिसावे याचाही विचार करतात. पण वापरून सोपे घाण होतात. सोफे साफ करणे हा पण एक मोठा टास्क असतो. आज आम्ही तुम्हाला अशी ट्रीक सांगणार आहोत की, ज्यामुळे तुमचे जूने सोफे सहज स्वच्छ होतील.

फॅब्रिक सोफा

हल्ली लोकांना फॅब्रिक सोफे फार आवडतात. या सोफ्यांचा लूकपण चांगला येतो आणि बसायलापण कम्फर्टेबल असतो. पण मेंटेन आणि साफ करण्यासाठी तेवढाच कठीण असतो. हा सोफा साफ करण्यासाठी ६ चमचे आंघोळीच्या साबणाचा चुरा घेऊन एक कप उकळत्या पाण्यात टाकावे. यात दोन लहान चमचे अमोनिया किंवा कुंकू मिक्स करावे. आता हे पाणी गार झाल्यावर त्याचा फेस करा. आता या फेसने स्वच्छ कपडा किंवा स्पंज घेऊन घाण झालेल्या भागावर लावावे. मग कोमट पाण्यात स्पंज भिजवून पिळून घ्या आणि पुन्हा त्या कापडाला स्वच्छ करा. आता सोफ्याला पंख्याच्या हवेत सुकू द्या.

लेदर सोफा

बऱ्याच लोकांना लेदर सोफे आवडतात. हे सोफे जसे महाग असतात तसच ते मेंटेन करण पण कठीण असत. हो सोफे साफ करण्याची एकच पध्दत आहे. हल्क्या क्लीनरने साफ करा. यासाठी कंपनीने सांगितलेले क्लीनर खरेदी करू शकतात.

याशिवाय तुमच्या सोफ्याला सॉफ्ट ब्रशने व्हॅक्यूम क्लीन करावे. सोफ्यावर जमलेली धूळ साफ करावी. सोफा साफ करायला मऊ कापड वापरावे. लेदर सोफा सुकवण्यासाठी ब्लो ड्रायरचा वापर करू नका. यामुळे सोफा खराब होऊ शकतो.

सोफ्याच्या कंडिशनिंगसाठी

सोफा साफ तर झाला पण त्याची चमक वाढवण्यासाठी या ट्रीक्स वापरा. सोफ्याची चमक वाढवण्यासाठी किंवा कंडीशनिंगसाठी व्हिनेगर आणि जवस तेल याचा वापर करू शकतात. याला २:१या प्रमाणात मिक्स करून सोफ्यावर लावा आणि सुकू द्यावे. दुसऱ्या दिवशी कापडाने साफ करून घ्यावे. तुमचा जूना सोफा नव्यासारखा चमकायला लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT