व्हॅलेंटाईन वीक (Valentine Day) सात फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. अनेक कपल या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. या सात दिवसात आपल्या पार्टनरला गुलाब, चॉकलेट, भेटवस्तू आणि इतर अनेक गोष्टी देऊन प्रेम व्यक्त करत असतात. कपलसाठी हे दिवस म्हणजे एक प्रकारचा मोठा उत्सव असतो. या आठवड्यात कपल्स वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जोडीदारावर प्रेम व्यक्त करतात. व्हॅलेंटाईन वीक सुरू होण्यापूर्वी कोणत्या दिवशी कोणते डेज आहेत हे माहित असणे खूप गरजेचे आहे. बऱ्याच कपल्सना हे दिवस माहित असतात पण धावपळीत कधी-कधी विसरायला होत. काळजी करू नका तुमच्यासाठी हे खास दिवस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.चला तर जाणून घेऊया.
व्हॅलेंटाईन वीक लिस्ट (Valentine Week List)
7 फेब्रुवारी - रोज डे
8 फेब्रुवारी - प्रपोज डे
9 फेब्रुवारी - चॉकलेट डे
10 फेब्रुवारी - टेडी डे
11 फेब्रुवारी - प्रॉमिस डे
12 फेब्रुवारी - हग डे
13 फेब्रुवारी - किस डे
14 फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन डे
७ फेब्रुवारी - रोज डे
सात फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे चा पहिला दिवस. या दिवशी आपल्या जोडीदाराला गुलाब देऊन भावना व्यक्त करायच्या असतात. तुम्हाला भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज भासणार नाही. फक्त एक लाल गुलाब द्या. गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांनी भावनांचे अर्थही बदलतात. जर तुम्हाला या व्हॅलेंटाईन वीकमध्ये एखाद्यावर प्रेम व्यक्त करायचे असेल, तर तुमच्या जोडीदाराला भेट म्हणून फक्त लाल गुलाब द्या.
८ फेब्रुवारी - प्रपोज डे
रोज डे झाल्यानंतर येतो तो प्रपोज डे. या दिवसाची मुले आतुरतेने वाट पाहत असतात. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला गुलाब देऊन समजावून सांगू शकला नाही, तर त्याच्याशी थेट बोलून तुमच्या भावना व्यक्त करा. एखाद्या रोमँटिक ठिकाणी, गच्चीवर किंवा मॉलच्या मधोमध जिथे तुमच्या मनाला वाटेल तिथे गुडघ्यावर बसा आणि जोडीदाराला प्रपोज करा.
९ फेब्रुवारी - चॉकलेट डे
नात्याची चांगली सुरुवात करण्यासाठी काहीतरी गोड पदार्थ खाऊन करा. यासाठी चॉकलेट डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला चॉकलेट गिफ्ट करू शकता. मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या पध्दतीचे चॉकलेट्स मिळतात. याला छानस पॅक करा किंवा अतिशय सुंदर पॅकिंगमध्ये तयार ही मिळतात. तुमच्या जोडीदाराला चॉकलेट्स गिफ्ट करून तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. विशेष म्हणजे मुलींना चॉकलेट्स खूप आवडत असतात.
१० फेब्रुवारी - टेडी डे
नात मजबूत करण्यासाठी भेटवस्तूंचा चांगला फायदा होतो. म्हणूनच टेडी डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला एक गोंडस लहान टेडी बियर भेट देऊ शकता. आज मार्केटमध्ये १०० रुपयांपासून २ हजारांपर्यंत टेडी बेअर आपल्याला पाहायला मिळतात.
११ फेब्रुवारी- प्रॉमिस डे
प्रेमसंबंधात वचनबद्धता खूप महत्त्वाची असते. दोन ह्रदयांना जोडणारा हा धागा आहे. जरी आपला जोडीदार वेगवेगळ्या शहरात राहत असला तरी, तो आपल्या सोबत आहे अशी फिलिंग प्रॉमिसमुळे येत असते. अशावेळी ११ फेब्रुवारीला प्रॉमिस डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला वचन देऊ शकता की, त्याचे प्रेम तुमच्यासाठी नेहमीच खास असेल.
१२ फेब्रुवारी - हग डे
प्रेमात स्पर्शाची भावना नाकारता येत नाही. प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही या दिवशी तुमच्या जोडीदाराला मिठी मारू शकता. त्या बदल्यात तुमचा जोडीदारही तुम्हाला प्रेमाने जादूची झप्पी देईल. समजून घ्या की त्याच्याही हृदयात तुमच्यासाठी अपार प्रेम आहे. आणि छान हा दिवस साजरा करा.
१३ फेब्रुवारी - किस डे
प्रेमाबद्दल खूप लिहलं जात. अनेक कथा, कादंबरी, कविता आहेत. प्रेमातल्या पहिल्या चुंबनाबद्दलही अनेक कवींनी बरच काही लिहिले आहे. या दिवशी तुम्ही जोडीदाराच्या कपाळाचे चुंबन घेऊन त्याच्या हातांचे चुंबन घेऊन किंवा त्याच्या ओठांचे चुंबन घेऊन तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. पण त्याआधी हे नक्की जाणून घ्या की तुमचा पार्टनर कम्फर्टेबल आहे का. किस डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला किस करून तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.
१४ फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन डे
एवढ्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेरचा व्हॅलेंटाईन डे येतो. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एकांतात क्षण घालवू शकता. यादिवशी तुम्ही जोडीदारासोबत तुमचा संपूर्ण दिवस एन्जाॅय करत व्हॅलेंटाईन डे संस्मरणीय करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.