लाइफस्टाइल

Valentine Day Celebration 2024 : लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहात? मग असा साजरा करा 'व्हॅलेंटाइन्स डे'

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असा साजरा करा 'व्हॅलेंटाइन्स डे'

Aishwarya Musale

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी कपल्सला एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला आवडते. मात्र, लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कपल्सला इच्छा असूनही त्यांच्या जोडीदारासोबत व्हॅलेंटाइन डे साजरा करता येत नाही. अशा परिस्थितीत व्हॅलेंटाईन डे काही खास पद्धतीने साजरा करून तुम्ही हा दिवस केवळ खास बनवू शकत नाही तर पार्टनरपासून दूर राहूनही तुम्ही त्यांच्याजवळ असल्याचा फील घेऊ शकता.

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमधील जोडप्यांना खूप एकटे वाटते. तसेच, या दिवशी लोक आपल्या पार्टनरला खूप मिस करतात. तुम्ही काही टिप्स फॉलो करून आपल्या जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकता. चला तर मग जाणून घेऊया व्हॅलेंटाईन डे लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये साजरा करण्याच्या टिप्स.

व्हर्च्युअल डेट प्लॅन करा

व्हॅलेंटाईन डेला तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत व्हर्च्युअल डेट प्लॅन करू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे घर सजवल्यानंतर तुमच्या पार्टनरला व्हिडिओ कॉल करू शकता. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत व्हर्च्युअल कँडल लाईट डिनर देखील करून पाहू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही एकमेकांच्या आवडत्या डिशची ऑर्डर देऊन हा दिवस खास आणि रोमँटिक बनवू शकता.

एक सुंदर गिफ्ट द्या

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असताना, तुम्ही तुमच्या जोडीदाराला व्हॅलेंटाईन डेला त्याची आवडती भेट देखील देऊ शकता. तुम्ही त्यांना ऑनलाइन गिफ्ट पाठवू शकता, तुम्ही तुमच्या जोडीदाराला एक सुंदर व्हॅलेंटाईन सरप्राईज देऊ शकता.

रोमँटिक मूव्ही पाहा

व्हॅलेंटाईन डेला, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एक रोमँटिक मूव्ही देखील पाहू शकता. अशा प्रकारे तुम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असूनही व्हॅलेंटाईन डे खूप खास पद्धतीने साजरा करू शकाल.

पार्टनला मेसेज पाठवा

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला एक सुंदर मेसेज देखील पाठवू शकता. या मेसेजमध्ये तुम्ही तुमचे प्रेम तिच्यासमोर व्यक्त करू शकता. तसंच, तुमच्या जीवनात तुमच्या पार्टनरचं महत्त्व सांगून तुम्ही त्यांचा दिवस खास बनवू शकता. त्याचबरोबर व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुमच्या पार्टनरला व्हॉईस नोट पाठवणे हाही एक चांगला पर्याय असू शकतो.

गाणं म्हणून दाखवा

जर तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायच्या असतील तर तुम्ही एखाद रोमँटिक गाणं रेकोर्ड करून ते तुमच्या पार्टनरला पाठवू शकता. तसेच व्हिडीओ कॉल करून देखील तुम्ही गाणं गाऊन दाखवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT