Valentine Day 2024 esakal
लाइफस्टाइल

Valentine Day 2024 : प्रेमापुढे वय देखील झुकले, वाचा ‘या' फिटनेस फ्रीक कपलची चिरतरूण लव्हस्टोरी

नव्वदच्या दशकातील स्टार असलेला ५८ वर्षीय अभिनेता आज ही त्याच्या खास फिटनेससाठी ओळखला जातो. खरं तर तो ५८ वर्षांचा आहे, असे त्याच्याकडे बघून वाटणार देखील नाही.

Monika Lonkar –Kumbhar

Valentine Day 2024 : नव्वदच्या दशकातील स्टार असलेला ५८ वर्षीय अभिनेता आज ही त्याच्या खास फिटनेससाठी ओळखला जातो. खरं तर तो ५८ वर्षांचा आहे, असे त्याच्याकडे बघून वाटणार देखील नाही. इतका तो फिट आहे. मी बोलतेय ते मॉडेल, अभिनेता आणि फिटनेस फ्रीक मिलिंद सोमणबद्दल.

तरूणांना लाजवेल असा फिटनेस असलेल्या अभिनेता मिलिंद सोमणची पत्नी मॉडेल अंकिता कोंवर देखील फिटनेसच्या बाबतीत काही कमी नाही. या दोन्ही फिटनेस प्रेमी कपलची लव्हस्टोरी देखील तितकीच रंजक आणि फिल्मी आहे.

प्रेमाला वयाचे आणि कशाचेही बंधन नसते, प्रेम हे प्रेम असते या वाक्याचा प्रत्यय या जोडीकडे पाहिल्यावर येतो. ‘व्हॅलेंटाईन स्पेशल’ स्टोरीमध्ये आज आपण या फिटनेस प्रेमी जोडप्याची लव्हस्टोरी जाणून घेणार आहोत.

अंकिता-मिलिंदची पहिली भेट कशी झाली?

अंकिता आणि मिलिंदची पहिली भेट ही एका नाईट क्लबमध्ये झाली होती. या नाईट क्लबमध्ये दोघांची एकमेकांवरची नजर काही हटत नव्हती. शेवटी अंकितानेच मिलिंदला हिंमत करून डान्ससाठी विचारले. यावर मिलिंदने होकार दिला.

त्यानंतर, या दोघांनी एकमेकांसोबत बराच वेळ डान्स केला. मनसोक्त डान्स केल्यानंतर शेवटी मिलिंदने अंकिताला तिचा मोबाईल नंबर मागितला. त्यानंतर, मोबाईलद्वारे दोघांचे संभाषण वाढले आणि त्यांच्या मैत्रीचा प्रवास सुरू झाला.

अशाप्रकारे मिलिंद अंकिताचा आधार झाला

मिलिंद-अंकिताने पहिल्या भेटीतच एकमेकांसोबत मोबाईल नंबर शेअर केले होते. त्यानंतर, त्यांचे फोनवरून बोलणे सुरू झाले. काही दिवसांनी त्यांची मैत्री एवढी घट्ट झाली की, या दोघांना एकमेकांशी बोललल्याशिवाय अजिबात करमत नव्हते. त्यानंतर, अंकिताच्या आयुष्यात एक दुर्दैवी प्रसंग ओढावला.

अंकिताच्या प्रियकराचा काही कारणांमुळे मृत्यू झाला होता. ज्यामुळे, तिच्या आयुष्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. या दु:खामुळे अंकिताला स्वत:वर नियंत्रण ठेवता येत नव्हते.

या दु:खद प्रसंगी मिलिंदने अंकिताची साथ सोडली नाही. तिला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केला. एक मित्र म्हणून मिलिंदने त्याची जबाबदारी निभावली. याच दरम्यान मिलिंद आणि अंकिताची मैत्री आणखी घट्ट झाली.

मिलिंदने व्यक्त केले प्रेम

मिलिंद आणि अंकिताची मैत्री घट्ट झाल्यानंतर हळूहळू या दोघांच्या भेटीगाठी देखील वाढल्या. या काळात मिलिंदच्या मनात अंकिताबद्दल प्रेम निर्माण झाले आणि त्याने त्याच्या मनातील भावना अंकिताकडे व्यक्त केल्या.

यावेळी मिलिंद अंकिताला म्हणाला की, ‘जेव्हा मी तुझ्या प्रेमात पडलो, तेव्हा तुझ्या जवळच्या प्रत्येक गोष्टीच्या प्रेमात पडलो. तुझ्या मनात जो तू सध्या दु:खाचा भार वाहतेस ना, त्यावर देखील माझे प्रेम आहे. त्यामुळे, घाबरू नकोस आपण दोघे मिळून याचा सामना करू’, अशा शब्दांमध्ये मिलिंदने त्याचे प्रेम अंकितासमोर व्यक्त केले. मिलिंदने व्यक्त केलेले हे प्रेम अंकिताने स्विकारले. त्यानंतर, दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरूवात केली.

५ वर्षांनंतर अडकले लग्नबंधनात

मिलिंद आणि अंकिताने जवळपास ५ वर्षे एकमेकांना डेट केले. त्यानंतर ५ वर्षांनी २२ एप्रिल २०१८ मध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकले. महाराष्ट्रातील अलिबागमध्ये मराठी रितीरिवाजांनुसार अंकिता आणि मिलिंद लग्नाच्या बेडीत अडकले. यावेळी दोघांचे मित्र-मंडळी आणि नातेवाईक उपस्थित होते.

Milind- Ankita Marriage

लग्नाच्या वेळी मिलिंदचे वय हे ५२ होते तर अंकिता केवळ २६ वर्षांची होती. त्यावेळी, या दोघांच्या वयातील अंतरावरून त्यांना सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. मात्र, याकडे दोघांनी मुळीच लक्ष दिले नाही. त्याचवर्षी मिलिंद आणि अंकिताने स्पेनमध्ये कॅथलिक रितीरिवाजांनुसार पुन्हा एकदा लग्न केले.

आज या दोघांना एक आयडिअल कपल म्हणून ओळखले जाते. दोघांना ही फिटनेसची प्रचंड आवड आहे. योगा, धावणे, रनिंग मॅरेथॉन, सायकलिंग अशा विविध अ‍ॅक्टिव्हिटीज दोघे सतत करत असतात. याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करताना ते दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT