valentine day special to say i love you easy but real life it is very hard to prove it
valentine day special to say i love you easy but real life it is very hard to prove it 
लाइफस्टाइल

'आय लव यु म्हणणं सोपं, ते टिकवता येणं अवघड '  

अ‍ॅड. सुनीता जंगम

फेब्रुवारी महिना आला की, तरुणपिढीचा उत्साह गगनात मावेनासा होतो. 14 फेब्रुवारीला व्हँलेटाईन डे च्या निमित्तानं एकमेकांना प्रेमाची मागणी घालणे, गिफ्ट देऊन प्रेमभावना समोरच्यापर्यत पोहचवणे, फुलांच्या माध्यमातून प्रेम प्रकट करणे या गोष्टीसाठी ही तरुणपिढी उत्सुक असते. कॉलेज जीवनातील फुलपाखरासारखे आयुष्य जगणारी ही पिढी, पुढे जाऊन व्यवहारी जीवनामध्ये कितपत यशस्वी होऊ शकेल हा विषयही त्यांच्या मनाला शिवलेला नसतो.  प्रेमाच्या आणाभाका घेणे आणि व्यवहारामध्ये हे प्रेम कायमस्वरुपी टिकविणे ही जीवनाची कसोटी असते.

गुलाबाचे फुल देऊन प्रेमभावना प्रकट झाल्या. परंतु माझ्या जोडीदाराला त्या फुलाचे काटे टोचणार नाहीत याची काळजी कितीजण घेतात, हा ज्याचा त्याचा विचार आहे. मग या दिवसाचे महत्व एवढे, जर प्रत्येक व्यक्तीनं असे ठरवले की प्रेम केले तर माझ्यासाठी प्रत्येक दिवस व्हँलेटाईन डे असणार आहे. माझ्या जोडीदाराबरोबर मी रोजच्या दिवसासाठी असणे, त्याची काळजी घेणे, त्याला आनंदी, समाधानी ठेवणे, हेच मी त्याला दिलेले गिफ्ट आहे. मग फक्त एकच स्पेशल डे का साजरा करायचा आहे? पटतयं का ?

खरं तर आताची पिढी खूप समजूतदार आहे. ते या गोष्टीचा विचार नक्कीच करत असणार, काही उदाहरणे पाहिल्यास एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते ती म्हणजे खरोखर या दिवशी सुरुवात केलेले प्रेमसंबंध आयुष्यभरासाठी प्रेम टिकवू शकतात का, अशावेळी काही सकारात्मक आणि नकारात्मक चित्रण यावेळी पाहायला मिळाले. काही जणांनी मोठ्या प्रयासानं आपले प्रेमसंबंध खुप कसोट्या, परिक्षा देऊन टिकवले. खूप अडचणींचा सामना करावा लागला तरी तो दोघांनी हातात हात घालून खांद्याला खांदा लावून केला. कोणत्याही परिस्थितीत जबाबदा-यापासून, कर्तव्यापासून पळ काढला नाही. शेवटपर्यत साथ देण्याचे वचन तंतोतंत पाळले.

दुस-या बाजूनं विचार केला तर नकारात्मक बाजू काही ठिकाणी स्पेशल दिवशी शपथा घेतल्या जातात. पण त्या टिकवताच येत नाही. कारण तो समजूतदारपणाच नसतो. सगळेजण करतात म्हणून ही मंडळी देखील दुस-याचे अनुकरण करतात. केवळ स्पेशल दिवस साजरा करायचा म्हणून प्रेमभावना प्रकट करणारे प्रेमवीरही काही कमी नाहीत. एक मजा म्हणून हा दिवस तुम्ही साजरा करता, त्यात कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसते. परंतु समोरचा जोडीदार संवेदनशील, भावूक असतो.

तुम्ही केवळ फँशन म्हणून काही करायला जाऊ नका. समोरच्याला पण मी आवडतो, आवडते का याचाही विचार करणे गरजेचं आहे. तुम्ही गांभीर्यानं घेत नसाल पण समोरचा घेत असेल तर तो किंवा ती दुखावली जाईल. या डे च्या निमित्तानं प्रेमसंबंध टिकवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे असे वाटते. केवळ पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण म्हणून हे स्पेशल दिवस साजरे होता कामा नये. तरच आपली कुटूंब व्यवस्था मजबूत राहील. कौटूंबिक न्यायालयातील घटस्फोटाची वाढती प्रकरणे बघून कितीतरी लोकांनी हे डे साजरे केले होते हे पाहून चिंता वाटते. भारतीय संस्कृती जपणे जास्त महत्वाचे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT