लाइफस्टाइल

Valentine Week : व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यासाठी पुण्याजवळील ही ठिकाणं आहेत बेस्ट, जाणून घ्या

व्हॅलेनटाईन डे ला पार्टनरला बाहेर घेऊन जायचंय? मग ही ठिकाणं आहेत बेस्ट

Aishwarya Musale

उद्यापासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होत आहे. तुम्ही व्हॅलेंटाईन वीकमध्ये तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी फिरण्याचा विचार करत आहात का? तर आज आम्ही तुम्हाला काही खास ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही एका दिवसात सुद्धा जाऊन येऊ शकता. कारण व्हॅलेनटाईन डे साठी आपल्याला कधीच सुट्टी मिळत नाही.

पण आपल्याला तो दिवस पार्टनरसोबत घालवावा असं वाटत असतं. काही ठिकाणं अशी आहेत जी पुण्यापासून काही अंतरावर आहेत. या ठिकाणी तुम्ही पार्टनरसोबत व्हॅलेनटाईन डे साजरा करू शकता. चला तर मग जाणून घ्या कोणती आहेत ती ठिकाणं.

लोणावळा

पुण्यापासून लोणावळा खूप जवळ आहे. येथील धबधबे, धरणं, किल्ले नेहमीच पर्यटकांना आकर्षिक करत असतात. तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत या ठिकाणी गेलात तर लॉन्ग ड्राईव्ह किंवा बाईक राईडचा आनंद तुम्हाला घेता येईल.

माथेरान

पुणे- मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे माथेरान. माथेरान हे रायगड जिल्ह्‍यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. पॅनोरमा, गार्बेट, अलेक्सझांडर, हार्ट, लिटल चौक, वन ट्री हिल, डेंजर, एको, लँडस्केप, लुईसा, पाक्युर्पाइन, मंकी, आर्टिस्ट, आदी पॉईंटस् पाहण्यासारखे आहेत.

अलिबाग

अलिबाग हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं ठिकाण आहे. तुम्ही बोट किंवा बाईक, कारने या ठिकाणी जाऊ शकता. तुम्ही पार्टनरला सरप्राईज देऊ शकता. अलिबागला पुण्यावरून जाण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही. पुण्यापासून ३ तासांच्या अंतरावर आहे.

माळशेज घाट

माळशेज घाटामध्ये अनेक धबधबे आहेत आणि विशेषतः पावसाळ्यात इथली हिरवाई अप्रतिम दिसते. पुण्यापासून १३० किमीवर हे ठिकाण आहे. माळशेज घाट हे हायकर्स, ट्रेकर्ससाठी हे उत्तम ठिकाणं आहे. गर्दीच्या ठिकाणापासून दूर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT