Astro Tips sakal
लाइफस्टाइल

Astro Tips: घरात या ठिकाणी ठेवा मोरपीस, ज्यामुळे येईल सकारात्मक ऊर्जा

वास्तुशास्त्रानुसार मोराचे पिस घरात सकारात्मक ऊर्जा आणतात.

Aishwarya Musale

वास्तुशास्त्रानुसार मोराचे पिस घरात सकारात्मक ऊर्जा आणतात. हे पिस जितके सुंदर दिसतात तितकेच त्याचे वैभवही वेगळे आहे. भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटावर असलेले मोराचे पिस घरातील अनेक समस्या दूर करू शकतात.

आपला भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. मोराचे सौंदर्य सर्वांनाच भुरळ घालत असते. पावसाळ्यात मोर आपला पिसारा फुलवून मनसोक्त नाचतो. मोराच्या या मयुरनृत्यावर अनेक बालगीते प्रसिद्ध आहेत. मोर जसा सुंदर आहे तसाच तो आपले आयुष्य सुंदर बनविण्यासही सक्षम आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात मोराची पिसे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. चला जाणून घेऊया कोणत्या दिशा आहेत?, नक्की कुठे मोराची पिसे लावावीत.

  • घराच्या पूर्व दिशेला मोराचे पिस ठेवणे खूप शुभ मानले जाते. याशिवाय उत्तर-पश्चिम दिशेलाही तुम्ही मोराची पिसे लावू शकता. शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत राहु दोष आहे त्यांनी मोराची पिसे उत्तर-पश्चिम दिशेला लावावीत.यामुळे कुंडलीतील दोष कमी होतो.

  • तुमच्या मुलांनी अभ्यासात लक्ष घालावे असे वाटत असेल तर, त्यांच्या पुस्तकात किंवा अभ्यासाच्या टेबलावर मोराची पिसे ठेवावीत. त्यामुळे मुलांचे मन अभ्यासात गुंतून राहते.

  • जर तुम्ही लिव्हिंग रूममध्ये पूर्व दिशेला मोराचे पिस लावले तर तुमच्या घरात सकारात्मकता उर्जा टिकून राहते.

  • याच बरोबर तुम्ही बेडरुममध्ये मोराची पिसे देखील ठेवू शकता. यामुळे मन प्रसन्न राहून वैवाहिक जीवन सुखी होते.

  • वास्तूदोष दूर करण्यासाठीही मोराच्या पिसांचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी मोराचे छोटे पंख एकत्र बांधून घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावावे.

  • घरात मोराची पिसे लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, घरातील सर्वांना दिसतील अशा जागी मोरपीस ठेवावे. यामुळे घरात सकारात्मक अनुभव येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT