Vastu Tips Esakal
लाइफस्टाइल

Vastu Tips: सकाळी उठल्याबरोबर 'या' पाच गोष्टी पाहू नका, नाहीतर संपूर्ण दिवस खराब होईल

अशुभ गोष्टी पाहिल्याने दिवस तर खराब होतोच, शिवाय अनेक अडचणीही निर्माण होतात.

सकाळ डिजिटल टीम

Vastu Tips : सकाळी लवकर उठून शुभ गोष्टी पाहिल्यास संपूर्ण दिवस शुभ जातो असे मानले जाते. त्यामुळे सकाळच्या वेळी धर्म आणि वास्तुशास्त्रात अशुभ मानल्या गेलेल्या गोष्टींचा कधीही विसर पडू नये. अशुभ गोष्टी पाहिल्याने दिवस तर खराब होतोच, शिवाय अनेक अडचणीही निर्माण होतात. अशा वेळी सकाळी डोळे उघडताच या गोष्टी चुुकूनही पाहू नयेत.


सकाळी सकाळी बंद पडलेली घड्याळ पाहू नका.

घरातील घड्याळीसोबत माणसांचे भविष्य जोडलेले असते.घरातली चालू घड्याळ अचानक बंद पडली तर ते वाईटप्रसंग तुमच्या येणार आहे याचा संकेत असू शकते.त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या बंद पडलेली घड्याळ पाहू नका.

सकाळी सकाळी खरकटे भांडी पाहू नका.

सकाळी उठल्याबरोबर तेल लावलेली किंवा घाणेरडी भांडी बघू नयेत. असे म्हणतात की सकाळी तेल असलेले भांडे पाहिल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे उरलेली भांडी रात्रीच स्वच्छ करावीत. ते सकाळसाठी सोडले जाऊ नये.

आपलीच सावली उठल्या उठल्या पाहू नका.

झोपेतून उठल्यावर लगेच आपण आपली सावली पाहू नयेसावली पाहणे हे राहुचा आपल्या आयुष्यात येण्याची शक्यता असते. आणि तुमचा दिवस अशुभ जाऊ शकतो.


हिंसक पक्ष्यांचे चित्र पाहू नका.

वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर देवी-देवतांची पूजा करण्यासोबतच असे काही उपक्रम करावेत ज्यामुळे संपूर्ण दिवस आनंदी जाईल. सकाळी उठल्याबरोबर असे चित्र पाहू नये, ज्यामध्ये प्राण्यांची आकृती आक्रमक आहे. अशी चित्रे पाहिल्यास अनेक अडचणी येऊ शकतात. कोणाशीही वाद होऊ शकतो.

आरशात चेहरा पाहू नका.
सकाळी उठल्यावर आरशात चेहरा पाहू नका काही लोक सकाळी उठल्याबरोबर आरशात आपला चेहरा पाहतात. वास्तुशास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते. सावली पाहू नका असे मानले जाते की सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला स्वतःची किंवा इतर कोणाचीही सावली दिसू नये. सकाळी सावली पाहणे अशुभ मानले जाते. सावली पाहिल्याने माणसांमध्ये भीती, तणाव आणि गोंधळ वाढतो.

सकाळी उठल्यावर कुत्रे बाहेर भांडत असतील तर ते पाहू नका. सकाळी उठल्यावर लगेच टॉयलेट कमोड पाहू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT