pan Esakal
लाइफस्टाइल

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार किचन मधील तव्याविषयी या गोष्टी कटाक्षाने पाळा..

आपल्या भारतीय कुटुंबांमध्ये स्वयंपाक घराला आणि तिथल्या प्रत्येक भांडे वस्तू यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेपासून ते कोणत्या दिशेला कोणती वस्तू ठेवावी इथपर्यंत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. इतकंच नव्हे तर वास्तुशास्त्र आयुष्यातील अशा अनेक गोष्टींबाबत मार्गदर्शन सुद्धा करते. आपल्या भारतीय कुटुंबांमध्ये स्वयंपाक घराला आणि तिथल्या प्रत्येक भांडे वस्तू यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. अशीच एक स्वयंपाक घरातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे तवा. तव्याचा वापर प्रत्येक घरात दररोज केला जातो. याच तव्याचा वापर कसा करायला हवा? तो स्वयंपाक घरात कोणत्या दिशेला ठेवायला हवा? या विषयी सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

1) गरम तापलेल्या तव्यावर चुकूनही पाणी टाकू नका.

आपण अनेकदा ऐकलं असेल की गरम तव्यावर पाणी टाकणे अशुभ मानले जाते. गरम तव्यावर पाणी टाकल्यास घरात विपरीत घटना घडू शकते.

2) वास्तु शास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्याने चरचर असा आवाज येतो. या आवामुळे घरात नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते. आणि या नकारात्मक ऊर्जेचा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

3) खरंतर तव्याचा संबंध राहू ग्रहाशी आहे, त्यामुळे तव्याचा योग्य पद्धतीने वापर न केल्यास राहू ग्रहाचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. त्यामुळे तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित जागी ठेवावा.

4) वास्तु शास्त्रानुसार तवा स्वयंपाक घरात नेहमी अशा जागी ठेवावा, जिथे बाहेरच्या व्यक्तीची नजर त्यावर पडणार नाही.

5) तवा नेहमी आडवा ठेवावा, त्याला कधीही उभा करून ठेवू नये.

6) तवा कधीही अशुद्ध अवस्थेत ठेवू नये. याचा वापर पूर्ण झाल्यानंतर तो नेहमी स्वच्छ करून ठेवावा. नाहीतर घरात दरीद्रता येते.

7) तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्याआधी त्या थोडे मीठ टाकावे,असं केल्यास घरात कधीही धन-धान्याची कमतरता भासत नाही.

8) रात्री तवा घासु नये असे देखील वास्तुशास्रात सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT