Vastu Tips Sakal
लाइफस्टाइल

Vastu Tips: कार पार्क करतांना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

Vastu Tips: वास्तुनुसार घरात कार कुठे पार्क करावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

vastu tips for car parking home right direction

हिंदु धर्मात वास्तुशास्त्राला खास महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये घरातील सर्व वस्तू ठेवण्यासाठी योग्य दिशा सांगितली आहे. असे मानले जाते की घरातील वस्तू योग्य दिशेने न ठेवल्याने व्यक्तीच्या जीवनात नकारात्मक परिणाम दिसतात.

वास्तुशास्त्रात कार पार्किंगचे काही नियम सांगितले आहेत. असे मानले जाते की या नियमांचे पालन केल्यास एखाद्या व्यक्तीला जीवनातील अपघातांपासून संरक्षण मिळते. तसेच, समृद्धी आणि यश मिळते. वास्तुशास्त्रात कोणते नियम सांगितले आहेत हे जाणून घेऊया.

कार पार्किंगसाठी योग्य दिशा कोणती

उत्तर-पश्चिम

उत्तर-पश्चिम दिशेला कार पार्क केल्यास समृद्धी आणि यश वाढते. तसेच आर्थिक लाभ मिळतो.

नैऋत्य दिशा

याशिवाय नैऋत्य दिशेला कार पार्क केल्याने शत्रूंवर विजय प्राप्त होतो. कारण ही दिशा राहूशी संबंधित आहे.

पश्चिम दिशा

पश्चिम दिशेला कार पार्क केल्याने आरोग्य निरोगी राहते आणि समृद्धी वाढते. कारण ही दिशा पाण्याची देवता वरुणशी संबंधित मानली जाते.

शुभ रंग

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही तुमची कार शेडमध्ये पार्क करत असाल तर कारशेडसाठी पिवळा, पांढरा आणि निळा रंग शुभ मानला जातो. कारण असे मानले जाते की हे रंग सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.

कारशेडचा आकार

कार पार्किंग करण्यासाठी घरात कारशेड असेल तर त्याचा आकार 2 ते 3 फुट चालण्याचे अंतर असणे गरजेचे आहे. यामुळे हवा खेळती राहते. जेथे कार ठेवता तेथे सुर्यप्रकाश पडला पाहिजे. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर जाते.

पुढील गोष्टींही ठेवा लक्षात

कार पार्क करताना नेहमी घराच्या मुख्य गेटपासून दूर ठेवावे.

गाडी पार्क केल्यावर त्यावर कव्हर टाकावी.

गाडी वेळोवेळी स्वच्छ ठेवावी. गाडी नेहमी स्वच्छ ठेवावी.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

SCROLL FOR NEXT