Vastu Tips Health Esakal
लाइफस्टाइल

Vastu Tips Health: घरातील सदस्य वारंवार आजारी पडतात, या '6' उपायांनी करा आजार दूर

प्रत्येक गोष्टीत सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते जी आपल्या जीवनावर परिणाम होतो.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येक गोष्टीत सकारात्मक आणि (Vastu Tips For Good Health) नकारात्मक ऊर्जा असते जी आपल्या जीवनावर परिणाम होतो. बरेच लोक वास्तूमध्ये विश्वास ठेवतात. अशा परिस्थितीत आपण किंवा घरातील सदस्य सतत आजारी राहत असेल तर तुमच्या घरात वास्तू दोष आहे. घरातील वास्तुू दोष कुटुंबातील सदस्यांवर परिणाम करतात.

आज आम्ही तुम्हाला अशा वास्तू दोषांबद्दल सांगत आहोत ज्याचा तुमच्या घरातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तसेच, त्यावरील उपायांबद्दल जाणून घ्या. असे केल्याने तुमच्या घरातील सदस्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल.

1) जर आपल्या घरासमोर एखादा खड्डा असेल तर यामुळे कुटुंबाला मानसिक त्रास आणि तणावाची समस्या निर्माण होते. तो खड्डा भरा आणि घरासमोर घाण नसल्याचे सुनिश्चित करा.

2) तुम्ही जेव्हाही जेवण कराल तेव्हा लक्षात घ्या की आपला चेहरा उत्तर किंवा पूर्वेकडील दिशेने असावा. असे केल्याने आपल्याला पोटाचे त्रास होणार नाही. तसेच, आपलं पचन देखील चांगले होईल.

3) घराच्या दक्षिण कोपऱ्यात दररोज लाल रंगाचे बल्ब आणि मेणबत्त्या पेटविणे आवश्यक आहे. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहिल.

4) जर आपल्या घरासमोर एखादे मोठे झाड किंवा खांब असेल आणि त्याची सावली घरात पडत असेल तर हा वास्तू दोष दूर करण्यासाठी घराबाहेर दोन्ही बाजूंनी स्वस्तिकचं चिन्ह काढा.

5) बेडरुम पूर्णपणे बंद करु नये. असे झाल्यास नकारात्मक उर्जेचा प्रभाव होतो. बेडरुमच्या समोर कधीही आरसा असू नये. ज्यांना मानसिक त्रास होत आहे, त्यांनी बीमपासून दूर राहावे. त्याशिवाय, शयनगृहात कधीही देवाची कोणतीही मूर्ती किंवा चित्र ठेवू नका.

6) वास्तुनुसार घराच्या शयनकक्षात जुन्या वस्तू गोळा करु नयेत. असे मानले जाते की असे केल्याने घरात नकारात्मक उर्जा प्रसारित होते. ज्यामुळे विषाणूजन्य रोग होऊ शकतात. हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT