Vastu Tips sakal
लाइफस्टाइल

Vastu Tips: आर्थिक संकटात आहात? मग देव्हाऱ्यात 'या' वस्तू ठेवाच!

वास्तुशास्त्रात सांगितलेल्या या गोष्टी घरात ठेवल्याने नकारात्मकता दूर होते.

Aishwarya Musale

वाढते कर्जे, आर्थिक संकट आणि जास्त खर्च यामुळे तुम्ही त्रस्त असाल तर याचं कारण वास्तुदोष असू शकतात. अनेकवेळा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहिल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात, ज्यामधीलच एक म्हणजे पैशाची कमतरता किंवा आर्थिक संकट आहे.

देव्हारा हे घरातलं सर्वात पवित्र स्थान मानलं जातं. हिंदू धर्मामध्ये पूजाअर्चेला विशेष महत्त्व आहे. या पूजेसाठी काही वस्तूंना शुभ मानलं गेलं आहे. या वस्तू घरात ठेवल्याने घरातलं वातावरण सकारात्मक राहतं, शिवाय समृद्धी आणि भरभराटीचे मार्गही मोकळे होतात, अशी मान्यता आहे. जाणून घ्या वास्तूशास्त्र काय सांगतं.

वास्तूशास्त्रानुसार काही गोष्टी देव्हाऱ्यात ठेवल्याने सुख-समृद्धी आणि धनवृद्धी होते. तसंच लक्ष्मीचा आशीर्वादही कायम राहतो.

घंटी

ज्या घरात नियमितपणे घंटीचा आवाज येतो तिथे सकारात्मकता राहते, असं मानलं जातं. म्हणून पूजा करताना घंटी वाजवली जाते.

मोरपंख

भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटावर मोरपंख लावलेला असतो. त्यामुळे काही जण मोरपंख घरात ठेवतात. मोरपंखामुळे संपत्तीत वाढ होऊन, घरात सुखशांती नांदते.

शंख

देव्हाऱ्यात शंख ठेवणंही शुभ मानलं जातं. पूजेनंतर शंखनाद केल्याने घरात सुख-समृद्धी आणि धनधान्य राहतं, अशी मान्यता आहे.

कलश

देव्हाऱ्यात रोजच्या रोज पाण्याने भरलेला कलश ठेवणं हे अनेक घरात दिनचर्येचा भाग आहे. गणपतीला कलश प्रिय आहे. त्यामुळे हा कलश ठेवला जातो.

गंगाजल

गंगाजल पितळ किंवा चांदीच्या पात्रात भरुन ठेवलं जातं. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. घरातल्या संपत्तीतही वाढ होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्मशानभूमीतील कपड्यांचा थाटला नवा घाणेरडा व्यवसाय, अहमदाबादला पोहोचत होते ‘ब्रँड न्यू’ बनून

IPL 2026: लखनौचा संघ चेन्नईलाही धक्का देणार?; ऋतुराज गायकवाडच्या संघासाठी प्लेऑफकरिता विजय आवश्यक, पहा कशी असेल Playing 11

Arzan Khambatta Sculptures : अरझान खंबाट्टा: शाळेत ड्रॉईंगमध्ये नापास होणारा मुलगा 'असा' बनला देशाचा प्रसिद्ध शिल्पकार

असं काय घडलेलं की, दिग्दर्शकांच्या पत्नीनं थेट उर्मिलाला मारलेली कानशिलात? अभिनेत्रीच्या एका चुकीमुळे बॉलिवूडने फिरवली पाठ?

Gold Price Drop in May : मे महिन्यात सोने स्वस्त, लग्नसराईत दिलासा!; ५ महिन्यात सोन्यात तब्बल ४० हजारांची घसरण

SCROLL FOR NEXT