Vastu Tips sakal
लाइफस्टाइल

Vastu Tips For Bathroom: बाथरूममध्ये लाल रंगाची बादली ठेवणे शुभ की अशुभ? जाणून घ्या

वास्तूमध्ये काही खास रंग सांगण्यात आले आहेत. ज्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात.

Aishwarya Musale

वास्तुशास्त्रानुसार लोकांच्या घरात ठेवलेल्या वस्तूंचा त्यांच्या जीवनावर खोलवर प्रभाव पडतो. वास्तुशास्त्राविषयी सांगायचं तर त्यात असं अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब केल्याने नशीब सुधारता येते.असाच एक उपाय बाथरूममध्ये ठेवलेल्या बादलीच्या रंगाशी संबंधित आहे.

वास्तूचे नियम बेडरूममध्ये, स्वयंपाकघरात आणि बाल्कनीमध्येही पाळणे अत्यंत आवश्यक आहे. बाथरूममध्ये योग्य रंगाच्या वस्तू न ठेवल्याने घरात नकारात्मकता पसरू शकते आणि लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की वास्तुनुसार बाथरूममध्ये कोणत्या रंगाची बादली ठेवणे शुभ मानले जाते.

भिंतींचा रंग आणि त्यात ठेवलेल्या बादलीचा रंग यांचाही लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. बाथरूमसाठी उत्तर किंवा उत्तर-पश्चिम दिशा उत्तम मानली जाते. किचनच्या समोर किंवा शेजारी बाथरूम कधीही नसावे.

बाथरूमच्या भिंती नेहमी हलक्या रंगात पेंट केल्या पाहीजेत जास्त गडद रंग वापरणे वास्तूमध्ये चांगले मानले जात नाही. बाथरूममध्ये ठेवलेल्या बादलीच्या रंगालाही वास्तूमध्ये खूप महत्त्व आहे आणि खूप गडद रंगाच्या बादल्या आणि मग बाथरूममध्ये ठेवू नयेत.

बाथरूममध्ये लाल बादली ठेवणे अशुभ आहे का?

बाथरूममध्ये वास्तुनुसार गडद रंगाच्या बादल्या आणि मग ठेवणे चांगले मानले जात नाही. तसेच बाथरूममध्ये लाल आणि काळी बादली ठेवल्याने वास्तुदोष होऊ शकतात. असे केल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडू शकते.

लाल रंग अग्नीचे प्रतीक मानला जातो, त्यामुळे बाथरूममध्ये तो रंग टाळावा. जर तुम्ही बाथरूममध्ये लाल रंगाची बादली आणि मग वापरत असाल तर शक्य तितक्या लवकर हलक्या रंगाची बादली ठेवा आणि लाल रंगाची बादली बाहेर फेकून द्या. असे केल्याने तुम्ही आनंदी राहाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT