Vastu Tips: Sakal
लाइफस्टाइल

Vastu Tips: बाथरूममध्ये ठेवलेल्या 'या' वस्तू वाढवतात नकारात्मकता, आजच काढा बाहेर

Vastu Tips: तुम्हीही बाथरूममध्ये पुढील गोष्टी ठेवत असाल तर काळजी घेणे गरजचे आहे.

Puja Bonkile

Vastu Tips: वास्तूशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होतो. वास्तूनुसार घरात ठेवलेल्या वस्तू सकारात्मक आणि नकारात्मक उर्जा मिळते. पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या बाथरूममध्ये पुढील गोष्टी असल्यास गरिबी येऊ शकते. वास्तुनुसार कोणत्या गोष्टी बाथरूममध्ये ठेऊ नये हे जाणून घेऊया.

ओले कपडे

जर बाथरूममध्ये ओले कपडे असतील तर ते धुवा आणि ताबडतोब सुकविण्यासाठी घराबाहेर ठेवा. ओले कपडे चुकूनही बाथरूममध्ये ठेऊ नका. कारण यामुळे सूर्यदोष होतो. ओले कपडे घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. त्यांना बाथरूममध्ये लटकवून ठेवल्याने घरात नकारात्मकता आणि वाद वाढतात.

तुटलेली चप्पल

तुटलेली चप्पल बाथरूममध्ये चुकुनही ठेवू नका. तुटलेली चप्पल देखील नकारात्मक उर्जेचे प्रतीक आहे. वास्तुशास्त्रानुसार तुटलेली चप्पल घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. ज्योतिष शास्त्रात असे म्हटले आहे की तुटलेली चप्पल घरातील ग्रहांची अशुभ स्थिती निर्माण करू शकते. त्यामुळे तुटलेली चप्पल ताबडतोब काढा आणि त्या जागी नवीन चप्पल घाला.

रिकामी बादली

वास्तूनुसार बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने घरामध्ये अशुभ निर्माण होते. त्यामुळे बाथरूममध्ये नेहमी पूर्ण बादली ठेवावी. रिकामी बादली हे गरिबीचे प्रतीक आहे. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की रिकाम्या बादलीमुळे घरातील धनाची हानी होऊ शकते. त्यामुळे नेहमी रिकामी बादली भरून ठेवा किंवा बाथरूममधून काढा.

तुटलेला आरसा

वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये चुकूनही तुटलेला आरसा ठेऊ नका. तुटलेला आरसा घरामध्ये वास्तुदोष निर्माण करू शकतो. यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे बाथरूम आणि घरात तुटलेला आरसा ठेऊ नका. त्यएवजी नवीन आरसा ठेवावा.

झाडे

वास्तूनुसार बाथरूममध्ये झाडे ठेऊ नका. बाथरूममध्ये ठेवलेली झाडे लवकर खराब होतात. यामुळे घरात वास्तूदोष वाढतो. झाडांना पुरेसा सुर्यप्रकाश आणि ताजी हवा हवी असते. यामुळे बाथरूममध्ये झाडे ठेऊ नका.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT