RTO Rules for EV: भारतीय बाजारात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढू लागली आहे. सध्याच्या काळात या वाहनांच्या किमती काहीशा जास्त असल्या तरी इलेक्ट्रिक वाहन Electric Vehicle खरेदी केल्यानंतर इंधनाच्या पैशात मोठी बचत होणार असल्याने आता अनेकजण या वाहनांना पसंती देऊ लागले आहेत. Vehicle Purchase Tips Know RTO Rules for EV Registration
शिवाय इलेक्ट्रिक वाहनांमुळे पर्यावरणाचं Environment नुकसान कमी होण्यास हातभार लागणार असल्याने शासनाकडून देखील इलेक्ट्रिक वाहन EV खरेदीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. सध्याच्या काळात खास करून इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकलची मागणी वाढताना दिसतेय.
पेट्रोलच्या वाढत्या किंमती पाहता लोकांना इलेक्ट्रिक टू व्हिलर EV Two Wheeler परवडणारी आहे. शिवाय या गाड्यांना मेंटेनेन्सचा खर्चही अत्यल्प आहे.
तुम्ही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करत असाल तरी तुम्हाला RTOच्या नियमांचं पालन करणं मात्र बंधनकारक आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी देखील शासनाने आणि RTO ने नियमावली आखली असून हे नियम खूपच साधे आहेत.
रजिस्ट्रेशन
कोणतेही वाहन खरेदी करत असताना त्या वाहनाचं रजिस्ट्रेशन करणं गरजेंच आहे. मग ते वाहन चारचाकी असो किंवा टूव्हीलर. हेच नियम इलेक्ट्रिक टू व्हीलरसाठी देखील लागू होतात. इलेक्ट्रिक वाहन खरेदी केल्यानंतर ते RTO मध्ये रजिस्टर करणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्ही ते वाहन चालवू शकता.
वाहनाचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला RTO कडून नोंदणी क्रमांक देण्यात येतो. ही नंबरप्लेट तुम्ही तुमच्या टू व्हीलरला लावावी लागते. इलेक्ट्रिक वाहनासाठी वेगळी नंबर प्लेट देण्यात येते. ही नंबर प्लेट हिरव्या रंगाची असून त्यावर पांढऱ्या रंगामध्ये नंबर असतात.
व्हेईकल स्पेसिफिकेशन आणि सबसिडीआरटीओ नियम आणि एआरएआयच्या नियमांनुसार इलेक्ट्रिक टू व्हीलरला देखील व्हेइकल स्पेसिफिकेशनचं पालन करणं बंधनकारक असतं. यामध्ये वाहनाचं वजन किती आहे, कमाल वीज उत्पादन आणि बॅटरी व्होल्टसारख्या गोष्टींचा समावेश आहे.
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सबसिडीचं धोरणही आखलं आहे. यात सबसिडी थेट इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना दिली जाते जिचा लाभ अप्रत्यक्षरित्या वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देखील मिळतो.
हे देखिल वाचा-
विमा
आरटीओच्या नियमांनुसार कोणत्याही इतर वाहनांप्रमाणेच इलेक्ट्रिक बाईक किंवा स्कूटरचा विमा असणं गरजेचं आहे. वाहन चालकाच्या सुरक्षेसाठी हा नियम बंधनकारक करण्यात आला आहे. शिवाय तुमच्या इलेक्ट्रिक टू व्हीलरचा विमा हा वेळोवेळी रिन्यू करणं आवश्याक आहे.
रोड टॅक्स
इलेक्ट्रिक टू व्हीलरला देखील रोड टॅक्स भरावा लागतो. असं असलं तरी इतर वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांना कमी रोड टॅक्स भरावा लागतो. त्यामुळे वाहन चालकाचा फायदा होतो.
याशिवाय इलेक्ट्रिक टू व्हीलर चालवण्यासाठी देखील तुमच्याकडे परवाना असणं बंधनकारक आहे. तसंच बाईक किंवा स्कूटर चालवण्यासाठी हेल्मटचा वापर करणं बंधनकारक आहे अन्यथा तुम्हाला दंड होऊ शकतो.
या इलेक्ट्रीक टू व्हीलरला RTO नियामांचं पालन करण्याची आवश्यकता नाही
दरम्यान अशा टू व्हीलर ज्यामध्ये मोटरद्वारे 250 वॅटपेक्षा कमी पॉवर तयार निर्मिती होते आणि ज्या वाहनांचा वेग ताशी 25 किलोमीटरपेक्षा कमी आहे, अशा टू व्हीलरला सायकलच्या श्रेणीमध्ये गणलं जातं. त्यामुळे अशा वाहनांना रजिस्ट्रेशन विमा किंवा आरटीओचे इतर निमय लागू होत नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.