Youth Tips  Sakal
लाइफस्टाइल

Youth Tips : 'बस कर पगले! रूलाएगा क्या'? वयाच्या १८ ते ३० मध्ये करू नका 'या' चुका

आयुष्यात वयाची १८ ते ३० हे वय कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात खूप महत्वाचे असतात.

सकाळ डिजिटल टीम

Viral Youth Tips : आयुष्यात वयाची १८ ते ३० हे वय कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात खूप महत्वाचे असतात. कारण या वयात व्यक्ती स्वतःला भविष्यात येणाऱ्या काळासाठी तयार करत असतो. अशा परिस्थितीत जीवन घडवण्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा असतो. यामुळेच १८ ते ३० वयोगटात प्रत्येकाने काही चूका टाळणे आवश्यक आहे.

सोशल मीडिया वेबसाइट Quora हे एक व्यासपीठ आहे जे लोकांसाठी आहे. या प्लॅटफॉर्मवर सामान्य लोक अनेक प्रश्न विचारत असतात. काही दिवसांपूर्वी एका यूजरने १८ ते ३० वयोगटातील लोकांनी कोणत्या चुका करू नयेत असा प्रश्न विचारला होता.

या प्रश्नावर अनेकांना पॉइंटर्स स्वरूपात उत्तरं दिले आहे. ही उत्तरं इतक्या आपुलकीने दिली जात आहे जी वाचून तुम्ही नक्कीच म्हणाल की, 'बस कर पगले! रुलाएगा क्या'! असंच वाक्य उच्चाराल.

"ब्रह्मचर्याचे पालन करा!"

विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना प्रत्येकाने या वयातील लोकांना अश्लील गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच भ्रष्ट विचारांपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा सल्लाही देऊ केला आहे. मोहित शर्मा नावाच्या व्यक्तीने सांगितले की, शारीरिक संबंधांकडे लक्ष न देता करिअरवर लक्ष केंद्रित करा असे म्हटले आहे.

प्रत्येक गोष्ट पैसा नसतो, म्हणून पैशाच्या दिशेने धावू नका आणि आपल्या कुटुंबाला वेळ द्या असा सल्ला काहींनी दिला आहे. करिअर पूर्ण होईपर्यंत प्रेमाच्या फंद्यात पडू नका असा प्रेमळ सल्ला एकाने देत जास्तीत जास्त ब्रह्मचर्याचे पालन करा असे म्हटले आहे.

“वयाच्या १८ ते ३० व्या वर्षी लोकांनी वेश्यांशी संबंध ठेवू नयेत, दिखाऊपणा करू नये, आई-वडिलांशिवाय कोणासमोरही रडू नये, केवळ शारीरिक संबंधासाठी प्रेमात पडू नये. असा सल्ला एका यूजरने दिला आहे.

या वयात धोका पत्करण्यापासून सल्ला कधीही मागे हटू नका, परंतु आधी स्वतःची क्षमता किती आहे याचा अभ्यास करून जोखीम घेण्याचा सल्ला पंकज जोशी या व्यक्तीने दिला आहे. तसेच जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत प्रेमप्रकरणात पडू नका, असे केल्याने तुमचा महत्त्वाचा वेळ वाया जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

C.P. Radhakrishnan Vice President of India : सी. पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव!

Sanjay Dutt: अजय देवगन संजय दत्तचा फॅमिली डॉक्टर? संजय दत्तचे हैराण करणारे खुलासे

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन! राष्ट्रपती-पंतप्रधानांसह मोठ्या नेत्यांचा राजीनामा, पण ज्यांच्या आदेशाने देश पेटला ते सुदान गुरुंग कोण?

Latest Marathi News Live Updates: एनडीएचे सी.पी. राधाकृष्णन १७वे उपराष्ट्रपती

Pali News : पाली नगराध्यक्ष पदासाठी घोडेबाजार! महायुतीमध्येच कुरघोडी व चढाओढ, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत

SCROLL FOR NEXT