लाइफस्टाइल

मास्क न घातल्यामुळे पोलिसांनी केली बेदम मारहाण; Video Viral

शर्वरी जोशी

नागरिकांच्या मदतीसाठी कायम तत्पर असणाऱ्या पोलिसांच्या कार्याविषयी आपल्या प्रत्येकालाच माहित आहे. कोणीही कितीही अडचणीत असलं तरीदेखील पोलिस तात्काळ त्यांच्या मदतीसाठी धावून जातात. मात्र, यात असेही काही पोलिस आहेत, जे अनेकदा त्यांच्या पदाचा गैरवापर करतांना दिसतात. सोशल मीडियावर अशा अनेक पोलिसांचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहेत. यात बऱ्याचदा कारण नसतांना एखाद्याला मारहाण करणं, हप्तेवसुली करणं किंवा एखाद्याला दमदाटी करणं असेही काही पोलिस पाहायला मिळाले आहेत. सध्या सोशल मीडियावर अशाच दोन पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल होत असून यात मास्क न घालणाऱ्याला त्यांनी बेदम मारहाण केली आहे.

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत.  यात अनेक ठिकाणी संचारबंदी, जमावबंदी करण्यात आली असून मास्क घालणं सक्तीचं करण्यात आलं आहे. मात्र, तरीदेखील अनेक जण या सगळ्याकडे दुर्लक्ष करुन नियमांचं उल्लंघन करतात. यामध्येच इंदूर येथे एका व्यक्तीने मास्क न घातल्यामुळे त्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीला प्रचंड मारहाण केल्यामुळे या दोन्ही पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.

इंदूर येथे राहणारे कृष्णा केअर हे रिक्षा चालक असून ते त्यांच्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी जात होते.  यावेळी त्यांच्या नाकावरील मास्क खाली घसरुन तो हनुवटीजवळ आला होता. कृष्णा यांच्या नाकावर मास्क नसल्याचं पाहिल्यावर दोन पोलिस त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी कृष्णा यांना पोलिस स्टेशनला येण्यास सांगितलं. मात्र,कृष्णा यांनी पोलिस स्टेशनला येण्यास नकार दिला. त्याच्यानंतर या पोलिसांनी कृष्णा यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. विशेष म्हणजे कृष्णा यांचा लहान मुलगा रडत रडत वडिलांना सोडण्याची विनंती करत होता. मात्र, पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

"खरं तर पोलिसांनी संबंधित इसमाला मास्क परिधान न केल्यामुळे पोलिस स्टेशनमध्ये येण्यास सांगितलं होतं. त्यावर या इसमाने पोलिसांसोबत अरेरावी करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर, या घटनेचा मूळ व्हिडीओ क्रॉप करण्यात आला असून या व्हिडीओच्या माध्यमातून पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रकरणी काही अंशी पोलिसांचीदेखील चूक आहे त्यामुळे त्यांनी निलंबित करण्यात आलं आहे. तसं पुढील तपास सुरु आहे", असं एसपी आशुतोष बागरी यांनी सांगितलं.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

Vilas Ghule Case : घुले हत्या प्रकरणी खासदारपुत्राला दिलासा, आरोपपत्रातून नाव वगळले

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT