Viral Video: Sakal
लाइफस्टाइल

Viral Video: अरे हे काय? नवरदेवाचे बूट चोरले म्हणून भर मंडपात मारामारी, पाच जण जखमी; पाहा व्हिडिओ

Viral Video: सोशल मिडियावर एका लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये बुट पळवल्यामुळे वधु-वर पक्षात मारामारी होतांना दिसत आहे. यामध्ये ५ लोक जखमी झाले आहे.

Puja Bonkile

viral video uttar pradesh amroha fight marriage between two groups juta chupai ritual 5 injured

लग्नसमारंभात नवरदेवाचे बूट पळवण्याची विधी खूप लोकप्रिय आहे. यामध्ये नवरीच्या बहिणी, मैत्रिणी या बुट पळवण्याच्या विधीमध्ये खूप व्यस्त असतात. त्यात अनेक गमतीजमती घडतात. बुटाच्या बदल्यात पैसे उकळण्याचा वधूच्या बहिणींचा प्लॅन असतो. सोशल मिडियावर एका लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये बुट पळवल्यामुळे वधु-वर पक्षात मारामारी होतांना दिसत आहे. यामध्ये ५ लोक जखमी झाले आहे.

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेला हिडिओ उत्तर प्रदेशमधील अमरोहा जिल्ह्यातील आहे. इथे एकाच मंडपात दोन मुलींची लग्ने होत होती. दोघांच्या लग्नाची मिरवणूक आली होती. जेव्हा बुट चोरण्याची विधी चालू होती तेव्हा कार्यक्रमात गदारोळ झाला होता. दोन पक्षांमध्ये मारामारी झाली. यामध्ये लोक एकमेकांना लाथा-बुक्क्या मारू लागले. यामध्ये 5 जण जखमी झाले.

  • बुटाच्या बदल्यात पैसे घेताना मारामारी

अमरोहा येथील हसनपूर नगर येथील एका लग्नमंडपात लग्न समारंभात पळवलेल्या बुटाचे पैसे देण्यावरून दोन पक्षांमध्ये मारामारी झाली. हसनपूर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या दोन मुलींचे रात्री लग्न होत होते. याच लग्नमंडपात लग्नाची मिरवणूक आली होती. लग्नाच्या मिरवणुकीत वराचा बूट पळवल्याच्या कारणावरून काही लोकांमध्ये बाचाबाची होऊन मारामारी झाली.

  • सीसीटीव्हीमध्ये कैद झाली घटना

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लग्न समारंभाच्या बाहेर उभ्या असलेल्या कारचीही तोडफोड करण्यात आली. यादरम्यान बराच गोंधळ झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण शांत केले आणि त्यानंतरच कार्यक्रम शांततेत पार पडला. मात्र, याप्रकरणी कोणतीही कायदेशीर कारवाई न करता दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला. या मारामारीत जखमी झालेल्या पाच जणांवर उपचार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT