Vitamin C esakal
लाइफस्टाइल

Vitamin C : त्वचेसाठी फायदेशीर असणारे ‘व्हिटॅमिन सी’ सीरम घरच्या घरी कसे बनवायचे? जाणून घ्या ‘ही’ सोपी पद्धत

Vitamin C : त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' हे फेस सीरम अतिशय उपयुक्त आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Vitamin C : आजकाल वातावरणातील बदल, वाढते प्रदूषण आणि धूळ याचा त्वचेवर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे, त्वचेच्या समस्या निर्माण होतात. मग, या समस्या दूर करण्यासाठी कुणी घरगुती उपायांची मदत घेताना दिसतात तर कुणी मार्केटमधील स्किनकेअर उत्पादनांचा वापर करतात. सुंदर आणि निरोगी त्वचा सगळ्यांनाच हवी असते. त्यासाठी नाना प्रकारचे उपाय करण्यावर भर दिला जातो.

थोडक्यात आपली त्वचा सुंदर आणि निरोगी रहावी, यासाठी प्रत्येक जण झटत असतो. परंतु, दरवेळी त्वचेसाठी घरगुती उपाय करणे आणि मार्केटमधील महागडी उत्पादने घेणे, हे प्रत्येकाला शक्य होतेच असे नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही तुम्हाला एका खास फेस सीरमबद्दल सांगणार आहोत.

जे तुम्ही काही गोष्टींच्या मदतीने घरच्या घरी सहज बनवू शकता. या फेस सीरमचे नाव आहे ‘व्हिटॅमिन सी’ सीरम, जे त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊयात व्हिटॅमिन सी सीरम बनवण्याची सोपी पद्धत.

व्हिटॅमिन सी सीरम बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • व्हिटॅमिन सी – २ कॅप्सूल

  • गुलाबजल - २ चमचे

  • ग्लिसरीन – १ चमचा

  • कोरफड जेल – ३ चमचे

  • १ छोटी काचेची बॉटल

व्हिटॅमिन सी सीरम बनवण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे

  • व्हिटॅमिन सी सीरम बनवण्यासाठी सर्वात आधी एक बाऊल घ्या.

  • आता बाऊलमध्ये कोरफड जेल आणि गुलाबजल मिसळा.

  • आता या मिश्रणात व्हिटॅमिन सी सीरमची कॅप्सूल मिक्स करा.

  • त्यानंतर, यामध्ये ग्लिसरीन मिसळून सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे एकत्र करा.

  • आता तुमचे व्हिटॅमिन सी फेस सीरम तयार आहे.

  • हे सीरम एका काचेच्या बॉटलमध्ये साठवून ते फ्रीजमध्ये ठेवून स्टोअर करू शकता.

  • ही काचेची बाटली काळी किंवा गडद रंगाची असेल तर अधिक चांगले. कारण यामुळे सीरम लवकर खराब होण्यापासून बचाव होईल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT