Vitamin Deficiency Dark Spots
Vitamin Deficiency Dark Spots esakal
लाइफस्टाइल

Vitamin Deficiency Dark Spots : जाणून घ्या नक्की कोणत्या व्हिटामीनच्या कमतरतेने होतात चेहऱ्यावर काळे डाग?

सकाळ डिजिटल टीम

Vitamin Deficiency Dark Spots : आपल्या त्वचेला जेवढा त्रास बाहेरच्या घटकांनी होतो तितकाच त्रास आपल्या शरीरातल्या घटकांनीही होतो. अनेकदा आपण चेहऱ्यावर काळे किंवा पांढरे स्पॉट्स बघतो, हे स्पॉट्स जावे म्हणून आपण अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट घेतो, वेगवेगळे क्रीम लावतो पण फरक दिसत नाही.

आपली त्वचा आपल्याला काहीतरी सांगू पाहत असते, पण आपल्याला ते कळत नाही. खरंतर तर चेहऱ्यावरचे हे डाग आपल्या शरीरातल्या व्हिटामीनच्या कमतरतेने येतात. आपण काही रोज खूप हेल्दी खातो असं नाही, त्यामुळे कुठे ना कुठे व्हिटामीनची कमतरता भासतेच.

हे व्हिटामीन असू शकतात चेहऱ्यावरच्या काळ्या डागांचे कारण

1. व्हिटामीन सी

व्हिटामीन सीला असोर्बिक अॅसिड सुद्धा म्हणतात. या अॅसिडच्या कमतरतेने चेहऱ्यावर स्पॉट्स तयार होतात. आपल्याला स्कीन प्रॉब्लेम होऊ नये म्हणून शरीरात कॉलॉजनचे प्रॉडक्शन होत असते. व्हिटामीन सी हे एक अॅंटी ऑक्सिडेन्ट आहे जे या कॉलॉजनच्या प्रोडक्शन साठी मदत करतात. तुम्ही आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी, पेरू किंवा चिंच खाऊन व्हिटामीन सीची कमतरता भरून काढू शकतात.

2. व्हिटामीन बी12

जर शरीरात व्हिटामीन बी 12 ची कमतरता असेल तर चेहऱ्यावर पिग्मेंटेशन सारख्या त्रासांची सुरुवात होते. त्वचेवर अचानक काळे डाग किंवा छोटे छोटे खड्डे पडू लागतात आणि चेहरा निस्तेज होतो. पिग्मेंटेशनपासून वाचण्यासाठी तुम्ही आपल्या जेवणात दूध, दही, चीज आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करू शकतात.

3. व्हिटामीन डी

पिग्मेंटेशन आणि डार्क स्पॉट्सच आणखीन एक कारण म्हणजे व्हिटामीन डीची कमतरता. अर्थात आपण लहानपणापासून याचा उपाय वाचतो आहोत. कोवळ्या उन्हाने आपण व्हिटामीन डीची कमतरता भरून काढू शकतो. शिवाय दूध किंवा दुग्धजन्य पदार्थाचे सेवन केल्याने किंवा मांस किंवा अंडी खाल्याने सुद्धा आपण काही प्रमाणात ही कमतरता भरून काढू शकतो.

4. मेलानिनची वाढ

मेलानिन हा पिग्मेंटचाच एक प्रकार आहे ज्याची मात्रा जर शरीरात जास्त असेल तर पिग्मेंटेशनचा त्रास वाढू शकतो. पिग्मेंटेशन दूर करण्यासाठी आपण व्हिटामीन ई फायदेशीर आहे. आजकाल बाजारात त्याच्या कॅपस्यूल सुद्धा उपलब्ध आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT