लाइफस्टाइल

Walking or Running : चालणे की धावणे कोणता व्यायाम आहे अधिक फायदेशीर? जाणून घ्या

चालणे की धावणे? कोणता व्यायाम आहे सर्वाेत्तम; जाणून घ्या

Aishwarya Musale

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे व्यायाम, जीवनशैली आणि चांगला आहार. उत्तम जीवनशैली आणि आहार मेनटेन केल्याने शरीर निरोगी राहते. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. सर्वात सोपा व्यायाम म्हणजे चालणे आणि धावणे आहेत. अनेकांना धावणे आवडते तर अनेकांना चालणे आवडते. या दोघांमध्ये सर्वोत्तम काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

चालणे आणि धावणे या दोन्ही गोष्टी तुमच्या आरोग्यावर अवलंबून असतात. हे दोन्ही उपक्रम अतिशय चांगले मानले जातात. चालणे किंवा धावणे यापैकी एक निवडण्यासाठी, तुम्हाला तुमचे आरोग्य पहावे लागेल.

वजन कमी करण्याच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास धावणे फायदेशीर ठरेल आणि फिट राहण्यासाठी तुम्ही वॉकिंग करू शकता. आरोग्य अहवालानुसार, फास्ट चालण्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका कमी होतो. याशिवाय बद्धकोष्ठतासारख्या पोटाशी संबंधित आजारांपासूनही आराम मिळतो.

वॉकिंग का करावे?

एका अहवालानुसार, चालण्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. याशिवाय चालण्याने तणावाची पातळी कमी होते आणि तणाव कमी होतो, ज्यामुळे तुम्हाला खूप ताजेतवाने वाटते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी चालणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

रनिंग का करावी?

जर तुम्ही कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करत असाल आणि दिवसभर लॅपटॉपसमोर बसत असाल तर तुम्ही रनिंग करावी. सतत बसल्याने पोटाची चरबी वाढते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही रोज सकाळी धावले पाहिजे. लठ्ठपणा कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे धावणे. धावण्याने कॅलरीज बर्न होतात ज्यामुळे वजन कमी होते. धावण्याने तुमच्या पायाचे स्नायू देखील मजबूत होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जहाजांची वाहतूक सुरु होण्याचा मार्ग मोकळा; इराणने दिली माहिती, सामंजस्य कराराचा मसुदा तयार

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीसाठी 'क्रिकेट देवा'चे खास ट्विट... क्रिकेट दिग्गजांकडूनही कौतुक! RR चा धावांचा डोंगर

Latest Marathi News Live Update : राजकारणापासून ते गुन्हेगारीपर्यंत देशात आज काय-काय घडलं? एका क्लिकवर जाणून घ्या प्रत्येक अपडेट

Mumbai-Goa Highway : झाडं लावली की फक्त कागदावरच दाखवली? मुंबई-गोवा महामार्गावरील 'त्या' 1 लाख 96 हजार वृक्षांचं नक्की काय झालं? प्रशासनाचा नवा प्लॅन काय?

Crime: भयंकर! ४८७ हून अधिक पुरुषांसोबत शरीरसंबंधासाठी दबाव, सिगारेटचे चटके, मारहाण अन्... प्रियकराचं प्रेयसीसोबत पाशवी कृत्य

SCROLL FOR NEXT