Cleansing Milk Tips esakal
लाइफस्टाइल

Cleansing Milk Tips : हृतासारखा मऊ चेहरा हवाय? फेस क्लिनिंग करतांना फॉलो करा 'या' टिप्स...

क्लिनझिंग मिल्क हे सौम्य क्लिंझर आहे जे त्वचेला स्वच्छ करण्यासाठी वापरले

सकाळ डिजिटल टीम

Cleansing Milk Tips : प्रश्न त्वचेचा असेल तर अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. आपण त्वचेवर काहीही वापरु शकत नाही. नैसर्गिक गोष्टींपासून बनवलेले पदार्थ त्वचेसाठी फायदेशीर असतात. त्वचेवर दुधाचा वापर फायदेशीर ठरतो. दुधाचा वापर त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी मदत करतो.

बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत ज्याने आपण आपला चेहरा स्वच्छ करु शकतो पण नैसर्गिक गोष्टींच्या मदतीने तुम्ही त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवू शकता. तुम्ही क्लिनझिंग मिल्क बद्दल ऐकले आहे का? यामुळे चेहऱ्यावरील घाण साफ होते.

क्लिनझिंग मिल्क म्हणजे काय?

आता तुम्हाला ते दुधापासून बनवलेले पदार्थ वाटत असेल पण असं नाहीये हे एक ब्युटी केयर प्रोडक्ट आहे. क्लिनझिंग मिल्क हे सौम्य क्लिंझर आहे जे त्वचेला स्वच्छ करण्यासाठी वापरले जाते. ते दुधापासून बनवले जात नाही. हे फॅट आणि पाणी यांचे मिश्रण आहे. तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये याचा समावेश करू शकता.

क्लिनझिंग मिल्क फायदे

- जर तुमची त्वचा कोरडी असते आणि तुम्ही अनेक उत्पादने वापरली तरीही काही फायदा होत नसेल, तर तुम्ही क्लिंजिंग मिल्क वापरावे. याचा वापर केल्याने तुमची त्वचा कोरडी होणार नाही.

- धुळीमुळे चेहरा सहज घाण होतो. चेहऱ्यावरील घाण साफ करण्यासाठी तुम्ही क्लींजिंग मिल्क वापरू शकता.

- क्लिनझिंग मिल्कमध्ये हार्ष केमिकल नसतात, तुमच्या त्वचेला इजा होणार नाही.

- जर तुमची त्वचा सेन्सिटीव्ह असेल तर तुम्ही क्लींजिंग मिल्कने फेस वॉश करू शकता. हे प्रोडक्ट प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी परफेक्ट आहे.

क्लिनझिंग मिल्क कसे वापरायचे?

सर्वप्रथम तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुमच्या त्वचेचा प्रकार काय आहे? बाजारात तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थांनी बनवलेले क्लिनझिंग मिल्क मिळेल. तुमच्या त्वचेला साजेसे प्रोडक्ट खरेदी करा.

- तळहातावर थोडे क्लिनझिंग मिल्क घेऊन चेहऱ्याला लावा.

- काही वेळ मसाज करा आणि कॉटन पॅडने चेहरा स्वच्छ करा.

- आता कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

- क्लिनझिंग मिल्क वापरल्याने तुमचा चेहरा स्वच्छ होईल.

क्लिनझिंग मिल्क कधी वापरावे?

सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी क्लिनझिंग मिल्कचा वापर करा. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास फेस वॉशऐवजी क्लिनझिंग मिल्कनेही चेहरा धुवू शकता.

या गोष्टी लक्षात ठेवा

- क्लिनझिंग मिल्क लावल्यानंतर तुमचा चेहरा लगेच धुवू नये, कारण ते तुमच्या त्वचेत शोषले गेले पाहिजे. म्हणजेच, आपण किमान अर्धा तास प्रतीक्षा करावी.

- जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर जास्त क्लिनझिंग मिल्क वापरले असेल तर तुम्ही ते कापसाच्या बॉलने स्वच्छ करू शकता.

- मेकअप काढण्यासाठी सुध्दा तुम्ही क्लिनझिंग मिल्क वापरू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT