How to Get luxury look washroom: Sakal
लाइफस्टाइल

Home Decor Idea: तुमच्या वॉशरूमला मिळेल हटके लुक, वापरा 'या' खास टिप्स

Washroom Decor Idea: सर्व लोकांना आपले घर सुंदर असावे असे वाटते. पण बाथरूमला लक्झरी लुक द्यायचा असेल तर पुढील गोष्टी वापरू शकता.

Puja Bonkile

How to Get luxury look washroom: सर्वजण घर सुंदर दिसण्यासाठी विविध गोष्टींचा सजवण्यासाठी वापर करतात. घरातील दिवाणखान्यापासून बाथरूमपर्यंत सर्व काही आलिशान बनवण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पण पैशाअभावी काही लोकांची इच्छा पुर्ण होत नाही. तुम्हालाही घरातील वॉशरूम हटके आणि सुंदर बनवायचे असेल तर पुढील छोट्या गोष्टींची मदत घेऊ शकता.

सुगंधित मेणबत्त्या

घरातील वॉशरूममध्ये काही सुगंधित मेणबत्त्या वापरू शकता. आपण ते ऑनलाइन किंवा कोणत्याही सजावटीच्या दुकानातून खरेदी करू शकता. यामुळे तुमच्या वॉशरूमला लक्झरी लुक मिळेल.

सुंदर वॉलपेपर

तुम्ही तुमच्या वॉशरूममध्ये सुंदर वॉलपेपर लावू शकता. डिझायनर वॉलपेपर तुमच्या वॉशरूमला अधिक लक्झरी लूक देण्यास मदत करेल.

मिनी स्टोअरचा वापर

सिंकच्या खाली असलेल्या रिकाम्या जागेत तुम्ही मिनी स्टोअर बनवू शकता. तुम्ही शॅम्पू, टूथपेस्ट, शेव्हिंग किट, टॉवेल यासारख्या गोष्टी ठेऊ शकता. यामुळे तुमच्या बाथरूममध्ये पसारा दिसणार नाही.

छोटी झाडे

बाथरूमला आलिशान बनवण्यासाठी तुम्ही वॉशरूममध्ये लहान रोपे किंवा सजावटीच्या वस्तु ठेऊ शकता. यामुळे तुमच्या वॉशरूमला एक आलिशान लुक मिळेल.

शोकेस

तुमचे बाथरूम लक्झरी बनवण्यासाठी तुम्ही शोकेस वापरू शकता. त्यात तुम्ही वॉशरूमशी संबंधित वस्तू किंवा इतर काही सजावटीच्या वस्तू ठेऊ शकता. या शोकेसमध्ये तुम्ही सुगंधित स्प्रे बाटल्या देखील ठेवू शकता. यामुळे तुमची वॉशरूम सुंदर आणि सुगंधी होईल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: ऑस्ट्रेलियाचे स्वप्न भंगलं! इंग्लंडच्या संघाने दणदणीत विजयासह गाठली फायनल; कर्णधार चमकले

NCP: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पांडुरंग पवार यांचं प्राथमिक सदस्यत्व रद्द; पक्षविरोधी काम केल्याचा ठपका

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात चार घरफोडीच्या घटना

Pune Crime : शिवाजीनगर परिसरात एटीएमजवळ तरुणाला लुटले, २८ हजारांची रोकड चोरी

T20 World Cup: 'हा डेंजर संघ आहे...' Dhoni सूर्याच्या टीम इंडियाबद्दल स्पष्टच बोलला; मनातील भीतीही सांगितली

SCROLL FOR NEXT