watermelon
watermelon esakal
लाइफस्टाइल

चेहऱ्यासाठी कलिंगडचा फेसपॅक ट्राय करा आणि पाहा फरक

सकाळ डिजिटल टीम

कलिंगड (watermelon) हे शरीराला अत्यंत उपयुक्त आहे. पण हेच कलिंगड चेहऱ्यासाठी देखील फायदेशीर ठरते. कलिंगडचा रस कोरड्या त्वचेसाठी उत्कृष्ट असतो. यामुळे चेहऱ्यावर (face beauty) तजेलपणा आणि चमकदारपणा आणण्यासाठी कलिंगडाचा वापर करावा. मात्र, हा फेसपॅक (watermelon facepack) कसा बनवायचा ते पाहुया. कलिंगड आणि काकडीचा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला कलिंगड आणि काकडीचा रस लागणार आहे. पाहूया कृती...

कलिंगड आणि काकडीचा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला कलिंगड आणि काकडीचा रस लागणार आहे. ते दोन्ही रस व्यवस्थितपणे एकत्र मिक्स करा आणि चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे ठेवा आणि थंड पाण्याने धुवा.

दूध आणि कलिंगडचा फेसपॅक तयार करण्यासाठी कच्च्या दुधामध्ये 2 चमचे किसलेले कलिंगड मिक्स करा. 25 ते 30 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि स्वच्छ पाण्याने धुवा.

लिंबू आणि कलिंगडचा फेसपॅक करण्यासाठी लिंबाचा रस आणि कलिंगड मिक्स करून घ्या आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. यामुळे आपला चेहरा हायड्रेट राहतो.

केळी आणि कलिंगडचा फेस मास्क आपण घरी तयार करू शकतो. यासाठी केळीचे तुकडे आणि किसलेले कलिंगड घ्या. हा फेसपॅक 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर लावल्यानंतर कोमट पाण्याने धुवा.

दही आणि कलिंगडचा फेसपॅक तयार करण्यासाठी दोन चमचे दही आणि कलिंगडचा रस मिक्स करा आणि 10 ते 15 मिनिटे हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

Summer Home Decor Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा करुन घ्या फायदा; 'अशा' पद्धतीने करा घराचा मेकओव्हर.. सर्वजण पाहतच राहतील

SCROLL FOR NEXT