Wedding Season
Wedding Season  esakal
लाइफस्टाइल

Wedding Season :  लग्नात आहेराच्या साड्यांवर नका करू जास्त खर्च, इथं मिळतात १०० ला चार साड्या!  

Pooja Karande-Kadam

Wedding Season :   

आज याच लग्न, उद्या त्याच, नव्या जोडप्यांना शुभेच्छा असे सगळं वातावरण सोशल मिडियावर आहे. लग्न ठरलं किंवा झालं हे आता पटकन लक्षात येतं. ते गल्लीतल्या पोरांनी, पाहुण्यांनी ठेवलेल्या स्टेटसवरून. पूर्वी संपूर्ण गावाला आमंत्रण असायचे. पण आता मुली मिळेनात म्हणून आणि लग्नाचा अफाट खर्च होणार म्हणून लग्न इकडची ५० अन् तिकडची ५० अशी उरकली जातात.

लग्न ठरल्यापासून सगळ्या गोष्टींच्या खरेदीला सुरूवात होते. मानपान, मुलीचा संसार सेट, रूखवत, कपडे आणि आहेराच्या साड्या. यात प्रामुख्यात जास्त पैसा खर्च होतो तो आहेराला देण्यात येणाऱ्या कपड्यांवर. लग्न साधं केलं किंवा मोठा लवाजमा करत. तरी मानपान ही गोष्ट अशी आहे की ती करावीच लागते.

काहीच नाही केलं तर लोक नावं ठेवतील या भितीने मुलीचे आईवडिल मानपान करतातच. तुमच्या घरीही लग्न असेल अन् तुम्हाला आहेराच्या साड्या, कपडे, टॉवेल टोपीचा मानपान खरेदी करायचा असेल तर काळजी करू नका.

आज आम्ही तुम्हाला अशा एका मार्केटबद्दलची माहिती देणार आहोत, जिथे या साड्या तुम्हाला केवळ २५ रूपयात मिळणार आहेत. २५ रूपयांपासून सुरू झालेल्या या साड्या तुम्हाला हजारों रूपयांच्या व्हरायटीही इथे पहायला मिळणार आहेत.

गणपती मिल, केशवनगर

पुण्यातील अनेक मार्केटमध्ये तुम्हाला होलसेल साड्या मिळतील. तर, पुण्यातीलच केशवनगर,मुंढवा, जी मॉल येथे गणपती साडी डेपो हे दुकान आहे. इथे सिंपल पण रेखीव प्रिंट असलेली साडी तुम्हाला फक्त २५ रूपयात मिळणार आहे.

या दुकानाता तुम्ही हव्या त्या रंगांच्या हव्या तितक्या साड्या केवळ २५ रूपयात घेऊ शकता. तुम्हाला होलसेल खरेदी करायची नसेल तर १ किंवा २ साड्या जरी घेतल्या तरी तुम्हाला सहज २५ रूपयात मिळू शकतात.

इटालियन सिल्क ३२० ची साडी १२५

इटालियन सिल्कचे नाव तुम्ही अनेक वर्षांपासून ऐकले असेल. या सूताची अनेक वर्षांपासून महिलांमध्ये क्रेझ आहे. हलक्या-फुलक्या कशाही वापरता येतात त्यामुळेच महिलांची पसंती या सिल्क साडीला मिळते. ही साडी तुम्हाला या दुकानात १२५ रूपयांना मिळणार आहे.

या साडीची इतर ठिकाणी किंमत ३०० ते ४०० रूपयांपर्यंत आहे. आहेराच्या साड्यांचा विचार केला तर या साड्या कमी किंमतीत आणि जास्त टिकावू अशा इटालियन सिल्कच्या फक्त १२५ मध्ये मिळतात.  

इटालियन सिल्क साडी

लायक्रा सिल्क २५० ची साडी १३० रूपयांत

आहेराच्या साड्या अगदीच हलक्या क्वालिटीच्या नको असतील. तर तुम्ही नक्कीच लायक्रा सिल्क कापडाचा विचार करू शकता. दिसायलाही आकर्षक अन् बाहेर एखाद्या कार्यक्रमालाही नेसता येईल अशी ही साडी आहे. ही साडी बाहेर तुम्हाला २५० पासून ५०० रूपयापर्यंत मिळते. पण इथे ही साडी केवळ १३० रूपयात मिळते.

मलई सिल्क अन् कॉटन साडी १९९ मध्ये

साड्यांमध्ये सगळ्या प्रकारच्या क्वालिटी आहेत. त्यातच अगदी सॉफ्ट कापड म्हटलं तर मलई सिल्कच्या साड्या महिलांच्या पसंतीस उतरल्या आहेत. तर दुसरीकडे कॉटन साड्यांचीही क्रेझ कमी झालेली नाही. तुम्ही अशा साड्यांचा विचार आहेरासाठी करत असाल तर या दोन्ही साड्या तुम्हाला १९९ मध्ये मिळतात.ज्यांची बाहेरील किंमत ५०० रूपये आहे.  

सिल्क साडी

पाहुण्यांना देण्यासाठीच्या साड्या

लेकीच्या सासवा, वहिन्या, नणंदबाई यांच्यासाठी तुम्ही अगदीच हलक्या साड्या घेऊ शकत नाही. त्यांना भारीतल्याच साड्या लागतातय तर त्याचीही काळजी करू नका. तुम्हाला केवळ २९९ मध्ये भारीतल्या साड्याही इथे मिळतील.

कॉटन ऑर्ग्रेंझा साडी, सिल्क मटेरियल, लीनन कॉटन, लेहरा पॅटर्न अशा अनेक व्हरायटीच्या साड्या तुम्हाला इथे मिळतील. ज्यांची किंमत २९९ पासून ४९९ इतकीच आहे. ज्यांची क्वालिटी बघून कोणीही म्हणणार नाही की या इतक्या कमी किंमतीच्या साड्या आहेत.

लग्नात या अशा साड्या घेऊन तुम्ही पाहुण्यांचे मन राखू शकता. ज्यामुळे त्यांना मानपान केला. म्हणून तुम्हाला समाधान आणि पाहुण्यांनी भारीतली साडी घेतली म्हणून पाहुणेही खूश.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT