Weight Loss sakal
लाइफस्टाइल

Weight Loss: जास्तीत-जास्त ताक प्या आणि वजन कमी करा, वाचा याबद्दल अधिक

वजन कमी करण्यासाठी वर्कआऊटसोबतच तुम्हाला तुमच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते.

Aishwarya Musale

वजन कमी करणे सोपे काम नाही. वजन कमी करण्यासाठी वर्कआऊटसोबतच तुम्हाला तुमच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. आपले वजन कमी करण्यासाठी लोक जिमपासून योगा आणि डाएटिंगपर्यंत सर्व काही फॉलो करतात. कठोर परिश्रम आणि कठोर दिनचर्याचे पालन केल्याने वजन कमी होते, परंतु वजन कमी झाल्यामुळे लोक पुन्हा जुनी दिनचर्या पाळू लागतात.

अशा स्थितीत आपले वजन पुन्हा हळूहळू वाढू लागते. अनेक वेळा सकस आहार आणि कमी कॅलरीजमुळे आपले वजन कमी होत नाही. पण इथे तुम्हाला तुमचे वजन कमी करण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने टिप्स सांगणार आहोत. ताक घेऊनही तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकता.

शिकंजी ताक

शरीरातील चरबी बर्न करण्यासाठी शिकंजी ताक हा उत्तम पर्याय असू शकतो. शिकंजी ताक आपल्या पोटाची चयापचय क्रिया वाढवते. एवढेच नाही तर हे ताक आपले पोट भरलेले तर राहतेच पण कॅलरीज बर्न करण्यासही मदत करते. हे करण्यासाठी साध्या ताकामध्ये लिंबू आणि काळे मीठ मिसळा. तुम्हाला हवे असल्यास त्यात पुदिन्याची पानेही टाकू शकता.

चिया सीड्स ताक

चिया सीड्स आरोग्याच्या दृष्टीने निरोगी मानल्या जातात. चिया बियांमध्ये फायबर आढळते. याचे जेल कंपाऊंड आपल्या शरीरातील चरबी काढून टाकण्याचे काम करते. तुम्ही तुमच्या ताकामध्ये चिया बिया मिक्स करून ते पिऊ शकता. वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी सर्वोत्तम पेय.

जवसाच्या बियांचे ताक

जवसाच्या बियांचे ताक पिण्यापूर्वी त्याच्या बिया भाजून पावडर तयार करा. याच्या बिया ताकात मिसळून प्या.याने शरीरातील चयापचय गतिमान होण्यास मदत होते. जवसामध्ये भरपूर फायबर असते, जे शरीरात साठलेली चरबी बर्न टाकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT