Weight Loss Tips esakal
लाइफस्टाइल

Weight Loss Tips : व्यायाम अन् डायटशिवाय बारीक होण्याचा जगातभारी फॉर्म्युला; पांढऱ्या रंगाला दूर ठेवा!

तुम्हाला व्यायाम आणि डायटची गरजही भासणार नाही

Pooja Karande-Kadam

Weight Loss Tips : जर तुम्हाला व्यायाम आणि डाएटिंगशिवाय वजन कमी करायचे असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगत आहोत. ज्या टाळून तुम्ही सहज वजन कमी करू शकता.

खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे सध्या लठ्ठपणा ही गंभीर समस्या बनत चालली आहे आणि धावपळीच्या जीवनामुळे लोकांना व्यायामासाठीही वेळ मिळत नाही. यामुळे लोकांना इच्छा असूनही वजन कमी करता येत नाही.

जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगत आहोत , जे तुम्ही जेवण टाळून वजन सहज कमी करू शकता. यासाठी तुम्हाला व्यायाम आणि डायटची गरजही भासणार नाही.

आज 'हे' 5 पांढरे पदार्थ खाणे टाळा

वजन कमी करण्यासाठी तुम्हाला फक्त आपल्या आहारात बदल करावा लागेल आणि आपल्या आहारातून 5 पांढऱ्या गोष्टी काढून टाकाव्या लागतील. मेदांता हॉस्पिटलचे एंडोव्हॅस्क्युलर सर्जन डॉ. राजीव पारख यांनी आपल्या फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करत सांगितले आहे की, वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारातून तांदूळ, पीठ, साखर, दूध आणि मीठ वगळा.  

आठवडाभरात तुमचे वजन कमी होईल

वजन कमी करण्यासाठी पांढरा तांदूळ, पिठापासून बनवलेल्या वस्तू, साखर आणि साखरेपासून बनवलेल्या वस्तू, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आणि मीठ खाणे बंद करा, असे डॉक्टरांनी सांगितले. विशेषत: रात्रीच्या वेळी या गोष्टी खाणे बंद करा. असे केल्याने वजन सहज पणे कमी होऊ लागेल आणि त्याचा परिणाम आठवडाभरात दिसेल.  

झोपण्याच्या 4 तास आधी खा

राजीव पारख म्हणाले की, वजन कमी करायचे असेल तर झोपण्याच्या सुमारे चार तास आधी जेवण करा. खाल्ल्यानंतर लगेच झोपी गेल्याने वजन झपाट्याने वाढते. तुम्ही आतापर्यंत ही चूक करत असाल तर ती ताबडतोब दुरुस्त करा आणि तुमचे वजनही झपाट्याने कमी होऊ लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT