Japanese Technique for weight loss 
लाइफस्टाइल

Weight Loss साठी जीवाचा आटापिटा करून झाला असेल तर ‘हारा हाची बु’ करा, फरक पडेल

'हारा हाचि बु' टेक्निकचे नियम काय आहेत

Pooja Karande-Kadam

Weight Loss Tips :

वजन कमी करण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या जातात, त्यापैकी एक म्हणजे हारा हाची बु. वजन कमी करण्याचा हा जपानी मार्ग आहे. या पद्धतीत भूक लागेल तेवढेच खावे असे सांगितले आहे. या पद्धतीचे नाव ‘हरा हाची बु’ असे आहे.

या पद्धतीमुळे 100 टक्के वजन कमी केले जाऊ शकते, असे आम्ही नाहीतर अनेक तज्ञ आणि डॉक्टर ही पद्धत वजन कमी करण्यासाठी प्रभावी मानतात.

जर तुम्हाला व्यायाम करून आणि आहाराचे पालन करूनही वजन कमी करता येत नसेल, तर तुम्ही वजन कमी करण्याची जपानी पद्धत वापरून पाहू शकता. हरा हाची बु काय आहे ते जाणून घेऊया. ही काय टेक्निक आहे, ती कशी वापरावी, त्याचा खरंच फायदा होतो का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.

हरा हाची बु म्हणजे काय?

हरा हाची बू डाएट म्हणजे तुम्ही तुमचे पोट 80 टक्के भरण्यासाठीच खावे. जपानच्या तत्त्वांनुसार, जर तुम्ही 100% पूर्ण अन्न खाल्ले तर तुमचे वजन वाढण्याची शक्यता वाढते आणि पचन प्रक्रिया देखील योग्य होते.

जपानमध्ये असलेल्या ओकिनावामधील बहुतेक लोक हा आहार पाळतात. या आहाराचे पालन करण्याचे अनेक फायदे आहेत. जर तुम्ही हा आहार पाळला तर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या कमी होतात आणि चयापचय विकार देखील कमी होतात. यासोबतच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार होण्याची शक्यता खूप कमी होते.

'हारा हाचि बु' टेक्निकचे नियम काय आहेत

  • अन्नाच्या प्रमाणाकडे लक्ष द्या, तुम्ही काय आणि कोणत्या प्रमाणात खात आहात याकडे लक्ष द्या.

  • हरा हाची बु नियमानुसार जास्त प्रमाणात खाऊ नका.

  • लहान भांड्यांमध्ये अन्न खावे

  • जे काही खास ते अन्न पूर्णपणे चावून खावे.

हरा हाचि बु आहाराचे फायदे

या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा असा आहे की तुम्ही समाधानाने जेवता, ज्यामुळे तुमची अन्न आणि पोषण या दोन्हींबाबत जागरुकता वाढते. हे पोटाशी संबंधित समस्यांपासूनही तुमचे रक्षण करते.

हे वजन कमी करण्यात यशस्वी ठरले आहे. ओकिनावा प्रदेशातील लोक दिवसाला फक्त 1800 ते 1900 कॅलरीज वापरतात, ज्यामुळे त्यांचे वजन नियंत्रणात राहते.

हे तुम्हाला लठ्ठपणापासून तसेच अपचन, बद्धकोष्ठता, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या, ऍसिड रिफ्लक्स आणि चयापचय विकारांसारख्या पाचन समस्यांपासून प्रतिबंधित करते. दीर्घकाळापर्यंत या समस्या टाळण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, कर्करोग आणि इतर वयोमानाशी संबंधित आजारांपासून देखील सुरक्षित राहाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT