Anulom Vilom Pranayam esakal
लाइफस्टाइल

Anulom Vilom Pranayam : शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी प्रभावी आहे अनुलोम-विलोम प्राणायाम, दररोज करा सराव

Anulom Vilom Pranayam : निरोगी जीवनशैलीसाठी योगा अतिशय फायदेशीर आहे. काही आरोग्य तज्ज्ञ दररोज योगासनांचा सराव करण्याचा सल्ला देतात. यामुळे, शारिरीक आणि मानसिक आरोग्य सदृढ राहण्यास मदत होते.

Monika Lonkar –Kumbhar

Anulom Vilom Pranayam : निरोगी जीवनशैलीसाठी योगा अतिशय फायदेशीर आहे. नियमितपणे योगाचा सराव केल्याने लहान समस्यांपासून ते मोठ्या समस्यांपर्यंत तुम्हाला आराम मिळू शकतो. अनेक आरोग्य तज्ज्ञ दररोज योगासनांचा सराव करण्याचा सल्ला देतात. यामुळे, आपले शारिरीक आणि मानसिक आरोग्य सदृढ राहण्यास मदत होते.

योगासनांमध्ये विविध प्रकारच्या योगासनांचा समावेश होतो, जे विविध प्रकारच्या शारिरीक आणि मानसिक समस्यांसाठी प्रभावी आहेत. परंतु, काही योगासने अशी आहेत, जी मानसिकदृष्ट्या प्रभावी असून आपले शारिरीक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत.

या योगासनांमध्ये अनुलोम-विलोमचा समावेश आहे. अनुलोम-विलोमचा नियमित सराव केल्याने आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हे एक प्रकारचे श्वासोच्छवासाचे योगासन आहे. ज्याचा सराव सर्व वयोगटांमधील लोकांसाठी सुरक्षित आहे. आज आपण या अनुलोम-विलोम प्राणायामबद्दल आणि त्याच्या फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. (Anulom Vilom Pranayam)

अनुलोम-विलोम प्राणायाम काय आहे?

अनुलोम-विलोम हे एक प्रकारचे योगासन आहे, ज्याला अनुलोम-विलोम प्राणायाम म्हणून ही ओळखले जाते. हा प्राणायाम करताना आपल्या श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवून सराव केला जातो. हा प्राणायाम नियमितपणे केल्याने आपला ताण-तणाव कमी होतो. शिवाय, श्वासोच्छवास आणि रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. अनुलोम-विलोम प्राणायाम करण्याचे इतर अनेक फायदे आहेत. (what is Anulom Vilom Pranayam)

अनुलोम-विलोम प्राणायाम करण्याचे फायदे खालीलप्रमाणे

  • अनुलोम विलोम प्राणायामचा दररोज सराव केल्याने शारिरीक समस्यांपासून संरक्षण मिळते आणि मानसिक आरोग्य मजबूत राहण्यास मदत होते.

  • अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने नैराश्य, ताण-तणाव आणि चिंता दूर होते. त्यामुळे, ज्या लोकांना ताण-तणाव, नैराश्याची समस्या आहे, अशा लोकांनी नियमितपणे अनुलोम-विलोम या प्राणायामचा सराव करणे, फायदेशीर आहे.

  • विशेष म्हणजे या प्राणायामचा सराव दररोज केल्याने आपल्या शरीरातील वात, कफ आणि पित्त हे दोष नियंत्रित होतात.

  • अनुलोम-विलोमचा नियमितपणे सराव केल्याने वजन कमी करता येते. शिवाय, शरीरातील चयापचयाची क्रिया सुरळीत होण्यास मदत होते.

  • या प्राणायामच्या सरावाने त्वचा आणि केसांचे आरोग्य देखील सुधारते. त्वचा फ्रेश आणि तजेलदार दिसण्यास मदत होते.

  • अनुलोम-प्राणायामचा दररोज सराव केल्याने राग, अस्वस्थता, विस्मरण आणि निराशा या नकारात्मक भावना दूर होतात. (Benefits of Anulom Vilom Pranayam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : दोन दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर पाणीत्याग... जरांगेंचा निर्धार! मुसळधार पावसामुळे मुंबईत मराठा आंदोलकांचे हाल

Latest Marathi News Updates : जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या मोर्चा; सकल मराठा समाज, मराठी भाषकांतर्फे आयोजन

Chandrashekhar Bawankule: काँग्रेसने केला ओबीसींवर अन्याय : बावनकुळे; महायुती सरकारनेच मराठा समाजाला दिला न्याय

Nagpur Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण, युवकाचा मृत्यू; एका आरोपीला जलालखेडा पोलिसांकडून अटक

Weekend Breakfast Recipe: वीकेंडला बनवा खास, सकाळी नाश्त्यात आस्वाद घ्या बीट ओट्स थालीपीठचा

SCROLL FOR NEXT