Benefits of Face Yoga esakal
लाइफस्टाइल

Benefits of Face Yoga : चेहऱ्यावरील फॅट्स कमी करण्यासाठी रोज करा फेस योगा;जाणून घ्या ‘हे’ फायदे

फेस योगा हा चेहऱ्याचा व्यायाम करण्याचाच एक प्रकार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Benefits of Face Yoga : चेहऱ्यामुळे आपले व्यक्तिमत्व आकर्षक आणि सुंदर दिसते. शरिरासोबतच आपण चेहऱ्याची काळजी देखील चांगल्या प्रकारे घेतो. चेहरा सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी आपण चेहऱ्यावर अनेक प्रकारच्या ब्युटी ट्रीटमेंट्स करतो.

या ट्रीटमेंट्समुळे चेहरा आकर्षक दिसतो आणि चेहऱ्यावर चमक ही येते. मात्र, वाढलेल्या वजनाचा प्रभाव ही चेहऱ्यावर दिसून येतो. तो प्रभाव आपण किती ही ब्युटी ट्रीटमेंट्स केल्या तरी टाळता येत नाही. यासाठी तुम्हाला व्यायाम करणे आवश्यक आहे.

फेस योगा हा चेहऱ्याचा व्यायाम करण्याचाच एक प्रकार आहे. फेस योगा नियमित केल्याने चेहऱ्यावरील डबल चिन गायब होण्यास मदत मिळू शकते. तसेच, चेहरा टोन्ड दिसण्यासाठी फेस योगा फायदेशीर आहे.

आज आपण, फेस योगा म्हणजे काय ? आणि फेस योगा करण्याचे फायदे काय आहेत ? ते जाणून घेणार आहोत.

फेस योगा म्हणजे काय ?

आपले वजन वाढल्यावर आणि वय वाढल्यावर त्याचा प्रभाव चेहऱ्यावर दिसू लागतो. चेहऱ्यावर डबल चिन येणे आणि वाढत्या वजनामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणे या गोष्टी चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागतात.

या सर्व गोष्टींचा प्रभाव कमी करण्यासाठी फेस योगाचा आधार घेतला जातो. फेस योगा केल्याने आपल्या चेहऱ्यावरील स्नायूंना ताण बसतो आणि ते घट्ट होण्यास मदत मिळते.

फेस योगा केल्याने चेहऱ्यावरील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. यामुळे, चेहऱ्यावरील फॅट्स कमी होऊ लागतात आणि चेहऱ्यावर एक प्रकारचा सुंदर ग्लो येतो.

फेस योगा करण्याचे फायदे कोणते ?

  • फेस योगा केल्यामुळे चेहऱ्यावरील मांसपेशी मजबूत होण्यास मदत मिळते.

  • फेस योगा केल्याने चेहऱ्यावरील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते आणि चेहरा निरोगी आणि तजेलदार दिसू लागतो.

  • चेहरा फ्रेश राहतो आणि त्वचेवरील वृद्धत्वाचा प्रभाव कमी करण्यास फेस योगा मदत करते.

  • फेस योगा केल्याने चेहरा छान टोन राहतो आणि चेहऱ्यावर ग्लो येतो.

  • तणाव कमी करण्यासोबतच मानसिक आरोग्यासाठी ही फेस योगा लाभदायी आहे.

  • फेस योगा केल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होण्यास मदत मिळू शकते.

  • नियमितपणे फेस योगा केल्याने चेहऱ्यावरील सूज आणि फॅट्स कमी होतात.

  • रोज फेस योगा केल्याने चेहऱ्याची त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

SCROLL FOR NEXT