HD Makeup
HD Makeup esakal
लाइफस्टाइल

HD Makeup : ब्राईडसाठी परफेक्ट असणारा HD मेकअप काय आहे? याचे प्रमुख प्रकार घ्या जाणून

Monika Lonkar –Kumbhar

HD Makeup Tips : मेकअप हा विषय महिलांचा अत्यंत जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. मेकअपमध्ये आता विविध ट्रेंड्सची आणि प्रकारांची सातत्याने भर पडताना दिसत आहे. HD कॅमेरा, HD फोटोनंतर आता HD मेकअपची ही भलतीच क्रेझ सर्वत्र पहायला मिळत आहे.

मागील काही वर्षांपूर्वी हा मेकअप फक्त बॉलिवूड आणि हॉलवूडपर्यंत मर्यादित होता. कित्येक अभिनेत्री हा एचडी मेकअप खास फोटोशूटसाठी करायच्या. मात्र, आता हा HD मेकअप सामान्य महिलांपर्यंत येऊन पोहचला आहे. अनेक महिला, तरूणी त्यांच्या लग्नात, खास फंक्शनसाठी या एचडी मेकअपचा वापर आवर्जून करतात.

आज आपण HDमेकअप म्हणजे काय? आणि या HD मेकअपचे प्रकार कोणते आहेत ? ते आपण जाणून घेणार आहोत.

HD मेकअप म्हणजे काय ?

HD मेकअप म्हणजे हाय डेफिनेशन (High Defination) मेकअप होयं. या मेकअपच्या मदतीने तुमचा मेकअप नॅच्युरल ठेवला जातो. या मेकअपमुळे चेहऱ्यावरील डार्क स्पॉट्स, काळी वर्तुळे, पिंपल्स आणि सुरकुत्या देखील लपवल्या जातात. या मेकअपमुळे तुमची त्वचा फ्लॉलेस दिसते आणि तुमचा चेहरा अधिक उठून दिसतो.

शिवाय, हा मेकअप अधिककाळ टिकतो आणि केकी वाटत सुद्धा नाही. या मेकअपचे फिनिशिंग चेहऱ्याला वेगळाच लूक देते. HD मेकअपची सुरूवात 6000  रूपयांपासून होते. HD मेकअपमधील प्रॉडक्ट्स आणि त्याची क्वालिटी यावर ही या मेकअपची किंमत ठरते. या मेकअपचा खर्च साधारण 30 हजारांपर्यंत जाऊ शकतो.

HD मेकअपचे प्रकार कोणते ?

Airbrush HD मेकअप

Airbrush HD मेकअप हा या HD प्रकारातला प्रमुख प्रकार आहे. या प्रकारामध्ये एअरब्रश मशिनचा वापर केला जातो. या ब्रशचा वापर करून हा मेकअप चेहऱ्यावर लावला जातो. या मेकअपमुळे तुमच्या चेहऱ्याला स्मूथ आणि फ्लॉलेस फिनिशिंग मिळते.

Mineral HD मेकअप

ज्या महिलांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांच्यासाठी हा Mineral HD मेकअप अगदी परफेक्ट आहे. या प्रकारच्या मेकअपमुळे तुमच्या त्वचेला छान चमक मिळते. हा मेकअप बराच काळ टिकून राहतो.

Liquid HD मेकअप

Liquid HD मेकअप हा एक प्रकारचा फाऊंडेशन मेकअप आहे. हा मेकअप चेहऱ्याला शोभून दिसतो. या प्रकारच्या मेकअपमध्ये ब्रश किंवा स्पंजचा वापर केला जातो, आणि त्यांच्या मदतीने हा मेकअप केला जातो. या प्रकारचा फाऊंडेशन मेकअप आपल्याला फूल कव्हरेज देतो आणि चेहऱ्याला ग्लॉसी लूक देतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT