Makar Sankranti 2024 esakal
लाइफस्टाइल

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला स्नानाचे आणि दानाचे काय आहे महत्व?

मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ग्रहांचा राजा सूर्यदेव जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो, अशी मान्यता आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ग्रहांचा राजा सूर्यदेव जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो, अशी मान्यता आहे. हिंदू धर्माचा हा प्रमुख सण असून या दिवशी सूर्यदेवाची आवर्जून पूजा केली जाते. ही पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि घरात सुख-शांती, समृद्धी येते असे मानले जाते.

सूर्याचे उत्तरायण याच दिवसापासून सुरू होते त्यामुळे अनेक भागांमध्ये मकर संक्रांतीला उत्तरायण असे ही म्हटले जाते. या वर्षी मकर संक्रांतीचा सण हा १५ जानेवारीला साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांतीला स्नानाचे आणि दानाचे देखील खास असे महत्व आहे. काय आहे ते महत्व? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

मकर संक्रांतीला स्नान आणि दानाचे महत्व काय?

देशातील अनेक राज्यांमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. हे स्नान केल्यानंतर दान करण्याची देखील परंपरा आहे. या दिवशी गंगा नदीमध्ये स्नान केल्याने आणि दान केल्याने व्यक्तीला पुण्य मिळते आणि संकटे दूर होतात अशी मान्यता आहे.

तसेच, मागच्या जन्मातील वाईट कर्मांपासून देखील मुक्ती मिळते आणि जीवन सुखी होते, असे मानले जाते. त्यामुळे, मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याचे हे खास असे महत्व आहे. यासोबतच, या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने १० अश्वमेध यज्ञ आणि १००० गाईंचे दान करण्यासारखे पुण्य मिळते, अशी देखील मान्यता आहे.

'या' गोष्टींचे दान करणे असते शुभ

मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर दान करण्याची परंपरा आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर चपल्ल, तीळ, गूळ, ऊबदार कपडे आणि ब्लॅंकेट दान केल्याने शनिदेवाची आणि सूर्यदेवतेची कृपा होते, अशी मान्यता आहे.

जर तुम्हाला पवित्र नदीमध्ये स्नान करणे शक्य नसल्यास तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यात तीळ आणि गंगाजल मिसळून घरी स्नान करावे. यानंतर, वरील गोष्टींचे दान करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial : 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या धर्तीवर होणार छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक; 350 कोटींचा विकास आराखडा तयार, उदय सामंतांची मोठी घोषणा

Moshi Garbage Dump Collapse : मोशी दुर्घटनेत 25 दिवसांचं बाळ झालं पोरकं, तर 2 आठवड्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवऱ्याचा अंत; नातेवाइकांचा आक्रोश पाहून पाषाणही पाघळेल

Jayden Adams: वर्ल्डकप फुटबॉलमध्ये खेळलेल्या २५वर्षीय आफ्रिका खेळाडूचे निधन

Latest Marathi News Update : तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा वाद थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे

Shreyas Iyer: क्लीन स्वीपनंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा; 'या' चुकीमुळे मालिकाच हातातून गेली! इंग्लंड दौऱ्यात नेमकं काय चुकलं?

SCROLL FOR NEXT