Cashew  sakal
लाइफस्टाइल

Cashew Nut Benefits: एका दिवसात किती काजू खाणे योग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

काजू चवीला अप्रतिम असण्यासोबतच आरोग्यासाठीही याचे आश्चर्यकारक फायदे आहेत.

Aishwarya Musale

काजू चवीला अप्रतिम असण्यासोबतच आरोग्यासाठीही याचे आश्चर्यकारक फायदे आहेत. काही लोकांना भरपूर पोषकतत्त्वे असलेले काजू इतके आवडतात की ते एकाच वेळी 10-15 खातात. मर्यादित प्रमाणात आणि योग्य वेळी काहीही सेवन करणे अधिक फायदेशीर असते. काही लोक काजू रोस्ट करून खातात तर काहीजण भाजून न खाता खाणे पसंत करतात. हे मुख्यतः खीर, शेवया, स्वीट डेजर्ट, हलवा, मिठाई इत्यादींमध्ये वापरले जाते. काजू कोणत्या प्रमाणात आणि कोणत्या वेळी खावेत हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे.

एका दिवसात किती काजू खावेत?

काजूचे जास्त सेवन केल्याने वजन वाढू शकते. अशा स्थितीत, तुमचे वजन वाढू नये असे वाटत असेल तर आणि त्याचे पौष्टिक फायदे मिळवण्यासाठी दररोज थोड्या प्रमाणात काजूचे सेवन करा.

यासाठी रोज फक्त 5 ते 10 काजू खावेत. जर तुम्ही हेल्दी फॅट आणि प्रोटीनचा स्रोत म्हणून सेवन करत असाल तर तुम्ही दिवसातून 15 ते 30 काजू खाऊ शकता. तज्ञ किंवा आहारतज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच काजूचे सेवन करणे चांगले.

एका दिवसात 40 पेक्षा जास्त काजू खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. एथलीट्स, स्पोर्ट्स मॅन 30-40 काजू खाऊ शकतात कारण त्यांचे चयापचय जास्त आहे. ते सामान्य लोकांपेक्षा अधिक शारीरिक हालचाली देखील करतात. तज्ञांचे मत घेऊनच काजूचे सेवन करणे चांगले.

काजू खाण्याची योग्य पद्धत कोणती?

जर तुम्हाला काजू खायला खूप आवडत असेल तर ते पाण्यात भिजवून खाल्ल्यास चांगले होईल. रात्री भिजत ठेवा आणि सकाळी सेवन करा. स्वीट डिश मध्ये टाकून खा. त्याचा प्रभाव उष्ण असल्याने उन्हाळ्यात मर्यादित प्रमाणातच खा. अल्कोहोलसोबत काजूचे सेवन करू नका. असे केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT