Health Care esakal
लाइफस्टाइल

Health Care : वीगन डाएट म्हणजे काय? फॉलो करण्यापूर्वी जाणून घ्या ‘हे’ फायदे

आजकाल अनेक जण फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआऊट्स आणि व्यायाम करतात. यासोबत विविध प्रकारच्या डाएटचा ही आहारात समावेश करतात. या डाएटपैकीच एक आहे वीगन डाएट

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : आजकाल अनेक जण फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआऊट्स आणि व्यायाम करतात. यासोबत विविध प्रकारच्या डाएटचा ही आहारात समावेश करतात. या डाएटपैकीच एक आहे वीगन डाएट (Vegan Diet)

अनेक जण या डाएटचा संबंध शाकाहारी आहाराशी जोडतात. परंतु, या वीगन डाएटची संकल्पना पूर्णपणे वेगळी आहे. अनेकांना ही संकल्पनाच माहित नाही. हे वीगन डाएट नेमके काय आहे? या डाएटचे फायदे कोणते आहेत? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

वीगन डाएट म्हणजे काय?

वीगन डाएट हा एक आहाराचा एक प्रकार आहे. या डाएटमध्ये प्राणी किंवा त्यांचा वापर करून बनवलेल्या उत्पादनांचा समावेश अजिबात नसतो. मात्र, अनेकांना असे वाटते की, हा शाकाहारी आहाराचा एक प्रकार आहे. परंतु, हे त्यापेक्षा वेगळे आहे.

या डाएटमध्ये फक्त आणि फक्त वनस्पतींपासून बनवलेल्या गोष्टींचा समावेश केला जातो. या डाएटमध्ये दूध, लोणी, चीज, मध, अंडी, मांस आणि इतर सर्व दुग्धजन्य पदार्थ खाल्ले जात नाहीत. सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास, हा एक प्लॅंट बेस्ड (वनस्पती आधारित) आहार आहे. ज्यामध्ये केवळ वनस्पतींपासून बनवलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश केला जातो.

आणखी एक खास बाब म्हणजे वीगन डाएटचा आहारात समावेश करणारे लोक प्राणी किंवा त्यांच्याशी संबंधित उत्पादने जसे की, कपडे, शूज आणि औषधे देखील वापरत नाहीत. (what is vegan diet)

वीगन डाएटचे फायदे कोणते?

हृदयासाठी फायदेशीर

वीगन डाएटमध्ये कॉलेस्ट्रॉलचा अजिबात समावेश आढळून येत नाही. त्यामुळे, आजारांचा धोका कमी होतो. इतकच नव्हे तर हे वीगन डाएट आपल्या हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी देखील फायदेशीर आहे.

रक्तदाब आणि मधुमेहींसाठी लाभदायी

वीगन डाएटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे मुबलक प्रमाण आढळून येते. त्यामुळे, हा आहार तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतो. हे डाएट जर तुम्ही फॉलो केले तर तुम्ही रक्तदाब आणि मधुमेह इत्यादी आजारांवर ही नियंत्रण ठेवू शकता.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

वीगन डाएट फॉलो केले तर ते तुमच्या शरीरातील कॅलरीजचे प्रमाण कमी करते आणि प्रथिनांच्या सेवनाला प्रोत्साहन देते. ज्यामुळे, वजन कमी होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT