Health Tips sakal
लाइफस्टाइल

Health Tips: कोणत्या वेळी दूध पिणे आरोग्यासाठी आहे फायदेशीर? जाणून घ्या

दूध पिण्याची योग्य वेळ कोणती हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का?

Aishwarya Musale

दुधामध्ये अनेक पोषक घटक असतात, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. दूध प्यायल्याने आपली हाडे आणि दात तर मजबूत राहतातच पण शरीराचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. पण दूध पिण्याची योग्य वेळ कोणती हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का?

काही लोक दिवसा नाश्ता करताना दूध पितात, तर काही लोक रात्री झोपण्यापूर्वी दूध पितात. संशोधनानुसार रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने चांगली झोप लागते. पण कोणत्या वेळी दूध पिणे जास्त फायदेशीर असते हे आपल्याला तज्ञांकडून जाणून घेऊ.

दूध किती वाजता प्यावे?

आपल्या सर्वांगीण विकासासाठी दूध आवश्यक आहे यात शंका नाही. दूध प्यायला हवे हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण वर्षानुवर्षे चर्चा होत आहे की दूध पिण्याची योग्य वेळ कोणती? बहुतेक लोक रात्री दूध पितात कारण त्यात आढळणारे बायोएक्टिव्ह एन्झाइम म्हणजेच ट्रिप्टोफॅन चांगली झोप घेते.

पण आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार वयाच्या ३० वर्षांनंतर रात्री दूध पिऊ नये. याचे कारण म्हणजे आपल्या लहान आतड्यात लैक्टेज नावाचे एन्झाइम तयार होते. या वयानंतर या एन्झाइमचे उत्पादन कमी होते. त्यामुळे मोठ्या आतड्यात दूध पचायला सुरुवात होते. ज्यामुळे पचन आणि पोटाशी संबंधित समस्या सुरू होतात.

आरोग्य तज्ञांच्या मते, 30 वर्षांखालील लोक दिवसा किंवा रात्री कधीही दूध पिऊ शकतात. हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. पण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही रात्री दूध प्यायले तर ते झोपण्याच्या 2 किंवा 3 तास आधी प्या. त्यामुळे तुमचे वय ३० वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्ही कधीही दूध पिऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT